प्रातिनिधिक छायाचित्र Pudhari photo.
सिंधुदुर्ग

Sindhudurg online fraud case | देवगडमध्ये गॅस बिल 'अपडेट'च्या नावाखाली ७ लाख ९२ हजारांचा ऑनलाईन गंडा

Sindhudurg online fraud case | पीडित जामसंडे परिसरातील, देवगड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दाखल

पुढारी वृत्तसेवा

Sindhudurg online fraud case

देवगड | प्रतिनिधी : ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच, आता देवगडमध्ये एका अनोळखी नंबरवरून आलेल्या 'एपीके' (APK) फाईलच्या माध्यमातून ७ लाख ९२ हजार ५२० रुपयांचा मोठा ऑनलाईन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सॲपवर एका अनोळखी नंबरवरून आली सूचना

फियार्दीनुसार, जामसंडे येथील रहिवासी असलेल्या पीडित व्यक्तीचे मुंबईतील दादर-माहीम परिसरात स्वतःचे घर आहे. हे घर त्यांनी भाड्याने दिले आहे. त्या घराचे गॅस कनेक्शन त्यांच्या नावावर आहे. रविवार, ५ एप्रिल रोजी सकाळी ९:३० ते १० च्या दरम्यान, त्यांच्या व्हॉट्सॲपवर एका अनोळखी नंबरवरून 'महानगर गॅस'चा लोगो असलेली एक एपीके फाईल आली. 'महानगर गॅस बिल अपडेट' करण्याच्या सूचना या मेसेजमध्ये देण्यात आल्या होत्या.

ऑनलाईन फसवणूक कशी झाली?

गॅस बिल अपडेट करण्याच्या आमिषाला बळी पडून पीडित व्यक्तीने ती फाईल आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली. त्यानंतर त्या ॲप्लिकेशनमध्ये विचारल्यानुसार, त्यांनी आपल्या 'बँक ऑफ इंडिया'च्या खात्याची आणि डेबिट कार्डची सर्व गोपनीय माहिती दिली. ही माहिती मिळताच, अवघ्या काही वेळातच अज्ञात संशयिताने त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ७ लाख ९२ हजार ५२० रुपये परस्पर ऑनलाईन पद्धतीने काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने देवगड पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

पीडित व्यक्तीच्या फिर्यादीवरून देवगड पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) ३१८ (बी), ३१८ (४), ३१६ (३) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या ६६(सी), ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्याम बुवा करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT