बुधवारी दुपारी पुन्हा दहिबांव नळयोजनेची फुटलेली पाईपलाईन. Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Deogad Water Pipeline Burst | जलवाहिनी दुरूस्त होताच दुसर्‍या दिवशी पुन्हा फुटली

देवगड -जामसंडेवासींयांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपेना

पुढारी वृत्तसेवा

देवगड : देवगड नळयोजनेची फुटलेली जलवाहीनी दुरुस्तीचे काम मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाले आणि पंपींग यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र दुसर्‍याच दिवशी बुधवारी दुपारी खाकशी साईमंदीर येथे पुन्हा जलवाहिनी फुटल्याने देवगड जामसंडेचा पाणीपुरवठा बंद झाला. यामुळे देवगड-जामसंडेवासीयांच्या मागचे टंचाईचे शुक्लकाष्ठ संपत नसल्याचे चित्र आहे. पाईप लाईन फुटणचे प्रकार सातत्याने होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

फुटलेली जलवाहीनी दुरुस्त करण्यात आली, मात्र पुन्हा खाकशी साईमंदिर येथे जलवाहिनी फुटली. ती तत्काळ दुरुस्त करावी, अशी सूचना संबंधित ठेकेदाराला दिली आहे. गुरुवारी सकाळपासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विशेष अनुदान योजनेअंतर्गत मंजूर सुधारणा कामातील पंपिंग व मोटर यंत्रणा काम पूर्ण झाले असून पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू व्हायचे आहे. त्यासाठी आवश्यक पाईपलाईन व साहित्य आले आहे.संबंधित ठेकेदाराला गुरुवारी बोलावून हे काम तत्काळ सुरू करावे, अशा सुचना देणार आहे.
साक्षी प्रभू, नगराध्यक्षा-देवगड

दहिबांव नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती व सुधारणा कामासाठी जुलै महिन्यात विशेष अनुदान योजने अंतर्गत 9 कोटी 21 लाख रूपये मंजुर झाले. या कामाचा शुभारंभही करण्यात आला. या कामांतर्गत जीर्ण झालेली 8 किमी जलवाहिनी नूतनीकरणाचा समावेश आहे. मात्र अद्यापही जलवाहीनी नूतनीकरणाचे काम सुरू झालेले नाही. हे काम लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक असून जलवाहिनी बदलण्याचे काम झाल्यास पाईप फुटीचे प्रमाण कमी होईल. यासाठी जलवाहिनी नूतनीकरणाचे काम सत्वर सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान जलवाहीनी दुरूस्तीचे काम गुरूवार सकाळपासून सुरू होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी दिली.

दहिबांव नळयोजनेची पाईपलाईन जीर्ण झालेली आहे. यामुळे ती वारंवार फुटत आहे, मात्र निधी मंजूर झालेल्या पाईपलाईन बदलण्याचे काम लवकर सुरू होणे आवश्यक आहे. वारंवार पाईपलाईन फुटत असल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला असून यामुळे जनता त्रस्त झाली आहे, याचा गांभीर्याने विचार करून पाईपलाईन बदलण्याचे काम लवकरच सुरू करावे. जेणेकरून नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटेल.
नितीन बांदेकर, नगरसेवक- देवगड न. पं.

देवगड-जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या दहिबांव अन्नपूर्णा नळयोजनेची जलवाहिनी मंगळवारी तीन ठिकाणी फुटली होती. जलवालिनी दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. सायंकाळी काम पूर्ण झाल्यानंतर पंपिंग सुरू करण्यात आले. मात्र बुधवारी दुपारी 1 वा. सुमारास खाकशी- साईमदिर येथे जलवाहीनी पुन्हा फुटली व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. या नळयोजनेची जवळपास 8 किमी पाईपलाईन पूर्ण जीर्ण झाली असून ती वरचेवर फुटत आहे. ही पाईप लाईन दुरुस्तीसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत 9 कोटी 21 लाख रुपये निधी मंजूर असून या कामामध्ये नवीन पंपिंग यंत्रणा, मोटर, तसेच पाईपलाईन बदलणे आदी कामांचा समावेश आहे.त्यापैकी पंपिंग व मोटर यंत्रणा हे काम पूर्ण झाले आहे तर नवीन बदलण्यात येणार्‍या पाईपलाईनसाठी पाईप आले आहेत, मात्र पाईप बदलण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT