मालवण : चिवला बीच येथे समुद्री खडकात अडकून पडलेल्या बैलाची सुखरूप सुटका जेसीपीच्या सहाय्याने करण्यात आली.  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Animal Rescue Sindhudurg | चिवला बीचवर खडकात अडकलेल्या बैलाची सुटका

बजरंग दलाचे कौतुकास्पद कार्य

पुढारी वृत्तसेवा

मालवण : मालवण येथील चिवला बीच कुरण परिसरात समुद्री खडकात पाय घसरून एक बैल पडला होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. लगेचच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले.

बैल खोल खडकात अडकलेला असल्याने त्याला बाहेर काढणे अवघड होते. मात्र जेसीबीच्या सहाय्याने व स्थानिकांच्या मदतीने बजरंग दलाने बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले.

भर पावसातही विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाचे सेवा कार्य सुरूच होते. या मोहिमेत जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर, मालवण संयोजक गणेश चव्हाण व गोरक्षक पार्थ डीचवलकर यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून मदतीस धाव घेतली.

बजरंग दल हे सेवा, सुरक्षा आणि संस्कार या कार्यांसाठी ओळखले जाते. यावेळी कार्यकर्त्यांनी आवाहन केले की, नव्या तरुणांनी आपली संपूर्ण शक्ती हिंदू राष्ट्र रक्षणासाठी एकत्र आणली पाहिजे.

या बचाव मोहिमेत प्रसाद हळदणकर, स्वप्नील घाडी, ललित चव्हाण, उत्कर्ष मांजरेकर (धुरीवाडा ग्रामस्थ), विशाल गोवेकर, चेतक पराडकर, शेखर खोरजे, महेंद्र माणगावकर, प्रेम वेंगुर्लेकर, यश घाडीगावकर (मालवण नगरपालिका), पवार साहेब, वळंजू मुकादम यांचे सहकार्य लाभले. तसेच जेसीबी चालकाचे मोलाचे योगदान मिळाले.

माजी नगरसेवक यतीन खोत व त्यांचे सहकारी अल्पेश वराडकर देखील उपस्थित होते. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बैलाची यशस्वी सुटका झाली. स्थानिक नागरिकांनी बजरंग दलाच्या या तत्परतेचे व सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT