landslide Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg landslide : भुईबावडा घाटातील दरड हटवून वाहतूक सुरळीत

पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भुईबावडा घाटात रविवारी (दि.16) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मोठी दरड रस्त्यावर कोसळली. त्यामुळे घाटातील वाहतूक सुमारे साडेतीन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवून सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळविले.

सह्याद्री पट्ट्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खारेपाटण गगनबावडा मार्गांवर भुईबावडा रिंगेवाडीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर भुईबावडा घाटात ही दरड कोसळली. दरड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जेसीबी घटनास्थळी पाठविला.

दरड हटविण्याचे काम सुरू करून प्रथम एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर दरड पूर्णपणे हटवून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, दरड हटविण्याचे काम सुरू असताना या मार्गावरील वाहतूक करूळ घाटमार्गे वळविण्यात आली होती. सह्याद्री पट्ट्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने वाहनचालकांनी खबरदारी घेऊन प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT