Amboli Hill Station  (Pudhari file Photo)
सिंधुदुर्ग

Tourists Alert Amboli | आंबोली परिसरात पूरसद़ृश परिस्थिती

Amboli Village Head Warning | नागरिक व पर्यटकांनी सतर्क रहावेः सरपंच

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : वर्षा पर्यटन साठी प्रसिद्ध आंबोली गावात उगम पावणारी हिरण्यकेशी नदी पात्र ओलांडून वाहू लागली आहे. गेले 3-4 दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सवत्र पाणीच पाणी झाले आहे.

आंबोली गावातील ग्रामस्थ व पर्यटकांनी योग्य ती काळजी घेऊनच बाहेर पडावे असे आवाहन आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी ग्रामस्थ व पर्यटकांना केले आहे.हिरण्यकेशी नदी पात्रातील गाळ केली कित्येक वर्षे उपसा न झाल्यामुळे दरवर्षी पूर सदृश परिस्थिती निर्माण होत असे.

येथील कबूलयतदार गावकर जमीन प्रश्न प्रलंबित असल्यामुळे येथील शेतकर्‍यांना पूर परिस्थिती मुळे होणारे शेत पिकांचे नुकसान ही भेटत नाही. प्रशासनाने या बाबत ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT