निर्णय राऊत
आंबोली : पश्चिम घाटातील जैवविविधतेचा मुख्य हॉट स्पॉट असलेल्या आंबोली परिसरात दुर्मीळ व अतिदुर्मीळ वन्यजीव, वनस्पती दिसून येतात. या परिसरात सापडणार्या उडत्या बेडका (मलबार ग्लायडिंग फ्रॉग) सह आंबोली टोड नंतर सर्वात आकर्षण आणि महत्वाचा तिसरा बेडूक म्हणजेच आंबोली बुश फ्रॉग (Amboli Bush Frog) आंबोली बुश फ्रॉग याचे शास्त्रीय नाव ‘स्यूडोफिलाटस अंबोली’ (Pseudophilautus amboli) असे आहे. स्युडो (Pseudo) म्हणजे खोटे किंवा फसवे आणि फिलाऊट (Philaute) म्हणजे मोहक. हे नाव या बेडकांचे वेगळे आणि काहीसे मोहक वैशिष्ट्य सांगते. दरवर्षी विशेषतः पावसाळ्यात आंबोली परिसरात वन्यजीव, वनस्पती, कीटक आदींचा नव्या प्रजातीचा शोध लागतो. शास्त्रज्ञांनी 2006 साली आंबोलीच्या जंगलातून ही प्रजाती शोधली. ही प्रजाती पश्चिम घाटामध्ये आढळणारी एक दमीर्र्ळ आणि प्रदेशनिष्ठ बेडूक प्रजाती आहे. ही प्रजाती महाराष्ट्रातील आंबोली, आंबाघाट तसेच कर्नाटकातील कॅसल रॉक, लोंडा, जोग फॉल्स, माविनगुंडी, कुद्रेमुख, मल्लेश्वरम आणि गोव्याजवळील कोटीगाव या परिसरात आढळते.
आंबोली बुश फ्रॉग बद्दल वन्यजीव तज्ञ आदित्य नानिवडेकर सांगतात, हा एक लहान बेडूक आहे, पण त्याच्या कुळातील इतर भाऊबंद प्रजातींपेक्षा हा मध्यम ते मोठा असतो. नरांमध्ये व्होकल सॅक म्हणजे गळ्यातून आवाज काढताना दिसणारी एक मोठी आणि पारदर्शक स्वर थैली किंवा पिशवी असते. शरीर मजबूत दिसते. बोटांची अग्रे बरीच मोठी असतात. कानाचे वरचे आवरण गडद तपकिरी रंगाचे असते. पाठीचा वरचा भाग काळसर तपकिरी रंगाचा असतो. पावसाळ्यात झाडांच्या खोडावर बसून नर मादीला आकर्षित करण्यासाठी टकटक-ट्रिक असा आवाज करतात. विशेषतः पावसाळ्यात रात्रीच्या अंधारात, आर्द्रता जास्त असताना हे आवाज टिपेला पोहोचलेले असतात. गळ्याला अत्यंत सुंदर पिवळसर रंग असतो, जो गळ्याची पिशवी फुगवल्यावर अजूनच सुंदर दिसतो. अंगावर बारीक काळे ठिपके असतात.
याचे प्रजनन एका विशेष पद्धतीने, ज्याला ‘डायरेक्ट डेव्हलपमेंट’ किंवा ‘थेट विकास’ म्हणतात असे होते. या प्रकारात त्याच्या विकासात ‘टॅडपोल’ हा टप्पा नसतो. त्याऐवजी त्याच्या प्रजनन चक्रात, अंडी ही थेट बेडकांमध्ये विकसित होतात आणि हे लहान बेडूक प्रौढ बेडकांसारखेच दिसतात. या प्रकारामुळे त्यांना पाण्याशिवाय पूर्णपणे जमिनीवर प्रजनन करण्यास सोपे जाते. बरेचदा अंडी ही पानांच्या खालच्या बाजूला किंवा झाडाच्या खोडावरदेखील चिकटलेली असतात.
अंडी नीट चिकटली आहेत की नाहीत याची खात्री करण्यासाठी मादी अंडी दिल्यानंतर काही काळ तिथेच थांबून राहते. अंड्यातील डिंभाला पाण्यातील पोषण न मिळाल्याने, त्याची भरपाई करण्यासाठी त्यांच्या अंड्यातील पिवळ्या भागात जास्त पोषणमूल्य असते. आतील गर्भ हा जेलीसारख्या भागाच्या आतमध्ये विकसित होतो. या टप्प्यात अंड्यांना जास्त आर्द्रता आवश्यक असते. जर या टप्प्यादरम्यान पाऊस थांबला आणि अचानक कोरडे हवामान आले तर हे त्यांच्यासाठी हानिकारक असू शकते. अंड्यांतून बेडूक साधारणतः एका आठवड्यात बाहेर पडतो. असे ह्या आंबोली बुश फ्रॉगचे जीवनचक्र आहे. जे पावसाळ्यात पहाता येतं! यासाठी पावसाळ्यात आंबोली परिसरात गेल्या काही वर्षात नेचर कॅम्पस् ला वन्यजीव व निसर्गप्रेमी पर्यटक मोठ्या संख्येने प्रतिसाद देतात.
आधीच ही प्रजाती दुर्मीळ असून, ते उीळींळलरश्रश्रू शपवरपसशीशव म्हणजे अत्यंत संकटग्रस्त प्रजात म्हणून नोंद आहे. शिवाय ते त्यांच्या मूळ भागातून नष्ट व्हायच्या मार्गावर असून त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे यांच्या अधिवास संरक्षणाला तातडीने प्राधान्य देऊन यांचे जतन, रक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.आदित्य नानिवडेकर, वन्यजीव तज्ज्ञ, पुणे
आधीच ही प्रजाती दुर्मीळ असून, ते उीळींळलरश्रश्रू शपवरपसशीशव म्हणजे अत्यंत संकटग्रस्त प्रजात म्हणून नोंद आहे. शिवाय ते त्यांच्या मूळ भागातून नष्ट व्हायच्या मार्गावर असून त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे यांच्या अधिवास संरक्षणाला तातडीने प्राधान्य देऊन यांचे जतन, रक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
आंबोलीमध्ये याचा अधिवास हा सदाहरित जंगलांजवळ, परंतु मानवी हस्तक्षेप असलेल्या भागात आहे. जमिनीपासून साधारण 1 ते 2 मीटर उंचीवर असलेल्या झाडांवर, झुडुपांत हे आढळतात. या प्रजातीसाठी सर्वात मोठा धोका म्हणजे जंगलांची तोडव यामुळे वनक्षेत्र कमी होणे, वाढते शहरीकरण आणि पर्यटन विकासाच्या विघातक कृतींमुळे अधिवास नष्ट होणे. हे बेडूक जंगलातील पाण्याच्या प्रवाहाच्या कडेला असणार्या भागातील झुडुपे, झाडांवर असतात. विविध कारणांमुळे होणारी वृक्षतोड, लोकांचा अधिक वावर झाल्यामुळे झुडुपे नष्ट होणे, अतिशय संवेदनशील ठिकाणी होणारे हवा-पाणी हे प्रदूषण यांसारखी अनेक कारणे यांच्या विनाशाला कारणीभूत ठरतात.