कोकण

सिंधुदुर्ग : आडाळी एमआयडीसी सुरू करण्याच्या मागणीसाठी लक्षवेधी लाँगमार्च

मोहन कारंडे

दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग मधील दोडामार्ग तालुक्यात गेल्या १० वर्षांपासून रखडलेली आडाळी एमआयडीसी त्वरीत सुरू करण्याच्या मागणीसाठी आज (दि.२०) आडाळी ते बांदा लक्षवेधी लाँगमार्च काढण्यात आला. भूमिपुत्रांना न्याय द्या, आडाळी एमआयडीसी सुरू करा, नको बैठका नको घोषणा आता उद्योग सुरू करा, परिसरातील बेरोजगार युवकांना न्याय द्या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या लाँगमार्चला एमआयडीसी क्षेत्र प्रवेशद्वार येथून सुरूवात होऊन बांदा येथे स्थगित झाला.

दोडामार्ग तालुक्यात आडाळी एमआयडीसी रखडलेली आहे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय स्वरुपाचे नसून रोजगारासाठी आहे. एमआयडीसीच्या रखडलेल्या प्रश्नाबाबत व होणाऱ्या दिरंगाई बद्दल राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा यातून प्रयत्न केला जात आहे. आडाळी एमआयडीसी सुरू झालीच पाहिजे, अशा भावना यावेळी आंदोलक युवक-युवतींनी केल्या. यावेळी तालुक्यासह जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर युवक-युवती सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT