कोकण

सिंधुदुर्ग : सरपंच, उपसरपंचानी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घडवला विमान प्रवास

backup backup

:  विमान प्रवास म्हटल की, एकदा तरी विमानातून प्रवास करायला हवा, अशी प्रत्येकाची संकल्पना असते. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हातील कणकवली तालुक्यातील वारगाव गावातील सरपंच व उपसरपंच यांनी चक्क सर्व कर्मचाऱ्यांना गोवा ते मुंबई असा विमान प्रवास घडवत सर्वसामान्य कुटुंबातील या कर्मचाऱ्यांना सुखद आनंद दिला. त्यामुळे या विमान प्रवासाची सर्वत्र एकच चर्चा होत सरपंच व उपसरपंच यांचे कौतुक केले जात आहे.

प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करावा असं वाटत असतं. ग्रामपंचायत वारगावच्या सरपंच नम्रता नारायण शेट्ये आणि उपसरपंच नाना शेट्ये यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांना गोवा ते मुंबई असा प्रवास विमानाने करता आला. ग्रामपंचायत वारगावचे सरपंच आणि उपसरपंच यांच्या सौजन्याने ग्रामपंचायत मधील विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमान प्रवासाची अनमोल पर्वणी लाभली. सदर विमान प्रवासात पाणी विभागात काम करणारे रामचंद्र जठार , ज्ञानेश कानकेकर , लिपिक विलास तळेकर , डाटा इन्ट्री ऑपरेटर श्रेया केसरकर तसेच परिचर म्हणून काम करणारे विलास मांजरेकर यांनी केलेला विमान प्रवास त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी अविस्मरणीय ठरला आहे. त्यांच्यासोबत गोट्या तेली विमान प्रवासातील सहाय्यक म्हणून उपस्थित होते. आपल्या ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमान प्रवासासारखा अभिनव उपक्रम राबविणाऱ्या ग्रामपंचायत वारगाव सरपंच नम्रता शेट्ये व उपसरपंच नाना शेट्ये यांचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT