कोकण

सिंधुदुर्ग : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तिलारी धरणावर विद्युत रोषणाई

backup backup

दोडामार्ग, पुढारी वृत्तसेवा : तिलारी धरण पाणलोट क्षेत्रात भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय ध्वजाची तिरंग्याची आरास करण्यात आली आहे. यावेळी धरणाच्या सॅडल डॅम येथील दरवाजातून विसर्ग होणाऱ्या पाण्याला केशरी, पांढऱ्या व  हिरव्या रंगाच्या विद्युत रोषणाईने सजवल्याने एक मनमोहक दृश्य दिसत आहे. भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा ७५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला होता.

यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम करण्याचे ठरवले. हा ​​महोत्सव १२ मार्च २०२२ रोजी सुरू झाला असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा केला जाणार आहे. भारतातील विविध राज्ये आणि आणि केंद्रशासित प्रदेशदेखील त्यांच्या स्थानिक पातळीवर हा उत्सव गावोगावी साजरा करत आहेत. धरणाचे पाणलोट क्षेत्र, विविध मंदिरे, कार्यालये अशा ठिकाणी अमृत महोत्सवानिमित्त भारतीय ध्वजाची तिरंग्याची आरास किंवा सुशोभन करुन उत्सव साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यातील तिलारी येथील आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तिलारी पाटबंधारे प्रकल्प विभागाने भारतीय तिरंग्याची आरास सजविली आहे. सॅडल डॅम येथे धरणाचे चार दरवाजे आहेत. पैकी तीन दरवाजांवर प्रत्येकी केशरी, सफेद व हिरव्या रंगाची विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे रविवारी रात्रौच्या वेळी धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याला राष्ट्रध्वजाच्या रंगाप्रमाणे स्वरूप प्राप्त झाले असून हे दृश्य अतिशय मनमोहक दिसत आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT