Youth Jumps Into Bavnadi River  AI photo
रत्नागिरी

Ratnagiri News | बावनदी पुलावरून तरुणाची नदीत उडी; शोधमोहीम सुरू

संगमेश्वर पोलिसांसह स्थानिक नागरिकांचे बचावकार्य; घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

Youth Jumps Into Bavnadi River

देवरुख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बावनदी येथील जुन्या पुलावर शुक्रवारी (दि.३१) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. रेवाळेवाडी (ता. संगमेश्वर) येथील एका तरुणाने सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास पुलावरून नदीत उडी मारल्याची घटना घडली. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, तरुणाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण पुलावर बराच वेळ उभा असल्याचे तेथून जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. उपस्थितांनी त्याच्याशी संवाद साधून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणांतच त्याने नदीत उडी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, तरुणाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कारण अद्याप स्पष्ट नाही

संबंधित तरुणाने हे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असून, घटनेमागील कारणांचा शोध घेत आहेत.

या घटनेची माहिती परिसरात पसरताच बावनदी पुलावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळापासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT