रत्नागिरी : तालुक्यातील गावडे-आंबेरे येथील खाडीत कालव काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू झाला. ही घटना 26 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वा. सुमारास घडली.
जिलानी राजेंद्र डोर्लेकर (वय 43, रा. गावडे-आंबेरे, रत्नागिरी) असे खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी त्या नेहमी प्रमाणे घराशेजारीच असलेल्या पूर्णगड खाडीत कालव काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तिला फिट आल्यामुळे ती खाडीच्या पाण्यात बुडाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
ही बाब सकाळी 8 वा. सुमारास त्यांच्या मुलाच्या निदर्शनास येताच त्याने तातडीने पाण्याबाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.