तळोजा खाडीत आढळला संशयास्पद मृतदेह File Photo
रत्नागिरी

गुहागरमधील तरुणाचा तळोजा खाडीत आढळला संशयास्पद मृतदेह

पुढारी वृत्तसेवा

गुहागर शहर : गणपतीसाठी मुळगावी जाणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना गुहागरमधील तळोजा खाडीमध्ये उघडकिस आली. अक्षय संतोष साळवी (वय.28 रा. खोडदे, गुहागर) असे मृत तरुणाचे नाव आहे. खोडदे येथील तरुण शुक्रवारी (दि.6) मध्यरात्री 12 वाजून दादर येथून निघाला होता. मात्र तो तरुण आपल्या गावी न पोहचता त्याचा मृतदेह रविवारी (दि.8) तळोजा नदीमध्ये सापडून आला.

त्याच्या या मृत्यूने खोडदे गावावरती शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यू मागचे गुढ उघडकीस आणण्यास पोलिस या घटनेची कसून चौकशी करत आहेत. अक्षय संतोष साळवी (वय.28 रा. खोडदे, गुहागर) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मृत्यदेह उपजिल्हा रुग्णालय पनवेल रायगड येथे आहे. त्याच्या मृत्यूची. माहिती मिळताच खोडदे गावातून त्याचे नातेवाईक पनवेल येथे दाखल झाले आहेत या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT