ठाणे : प्रियकराचा धावत्या ट्रेनमधून पडून संशयास्पद मृत्यू

पोलीस उपनिरीक्षकासह दोन अंमलदार निलंबित
dead body
dead bodypudhari news network
Published on: 
Updated on: 

भिवंडी : एका 24 वर्षीय प्रियकराने अल्पवीयन प्रेयसीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकाने वाशिंद पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीस पथकाने प्रियकर आणि प्रेयसीचा शोध सुरू केला असता, एक महिन्याच्या तपासाअंती दोघे मध्य प्रदेशातील एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समोर आले. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन राजधानी एक्सप्रेसने येत असतांनाच, प्रियकराचा धावत्या ट्रेनमधून पडून संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याने ट्रेनच्या बोगीमधील टॉयलेटच्या खिडकीतून उडी मारून जीवनप्रवास थांबविल्याचे सांगितले. मात्र प्रियकराच्या नातेवाईकांनी ग्रामीण वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याकडे आमचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात असताना त्याने जीवनप्रवास थांबविला नाही तर त्याची हत्या झाल्याची तक्रार दिली आहे.

या तक्रारीवरून एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस अंमलदार अशा तिघांना निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केल्याने ठाणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अनिकेत जाधव (24) असे मृतक प्रियकर मुलाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार,भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर येथील मृतक अनिकेत जाधव व शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी हे 25 जुलै रोजी दोघेही लग्न करण्याच्या उद्देशानं पळून गेले. मात्र त्यावेळी मुलीचे अपहरण मृतक अनिकेत याने केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकाने वाशिंद पोलीस ठाण्यात दिली होती.

या तक्रारीच्या अनुषंगानं पोलीस पथकाने दोघांचा शोध सुरू केला असतानाच, ते महिनाभरापासून मध्यप्रदेश राज्यातील एका शहरात असल्याची माहिती वाशिंद पोलिसांना मिळताच, वाशिंद पोलिसांनी मध्यप्रदेशातील पोलिसांच्या मदतीने वाशिंद पोलीस व मुलीच्या नातेवाईकांनी मध्यप्रदेश येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या ठिकाणाहून अनिकेत व त्याच्या सोबत असलेल्या त्याची प्रेयसी या दोघांना 25 ऑगस्ट रोजी मध्यप्रदेश येथून ताब्यात घेऊन येत असताना राजधानी एक्सप्रेस गॉलियर मुराई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रेन येताच अनिकेत याचा ट्रेनमधील बोगीच्या टॉयलेटच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याचे वाशिंद पोलिसांनी त्यावेळी सांगितले. त्यामुळे त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद मुराई रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. दरम्यान, अनिकेतचा मृत्यू हा पोलिसांच्या ताब्यात असताना झाल्याने नातेवाईकांनी अनिकेतचा मृत्यू नव्हे तर त्याचा घातपात मुलीच्या घरच्यांनी केल्याचा आरोप केला होता. पोलिसांच्या ताब्यात असतानाही अनिकेतचा रेल्वे अपघातात मृत्यू होणे एक संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अनिकेतच्या कुटुंबीयांनी करत याबाबत सखोल चौकशी न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाइंचे किरण चन्ने यांनी दिला होता.या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी मृत अनिकेतला मध्यप्रदेश मधून ताब्यात घेणारे वाशिंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वांगड , पोलीस अंमलदार जोगदंड, चलवादी या तिघांना 31 ऑगस्ट रोजी निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बर्वे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news