Sangameshwar Rickshaw Driver Death Pudhari
रत्नागिरी

Sangameshwar Accident | उभ्या रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक; चालकाचा जागीच मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील देवळे फाटा येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Hit and Run Sangameshwar Rickshaw Driver Death

देवरुख : रत्नागिरी–नागपूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील देवळे फाटा येथे उभ्या असलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि.३०) सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

चाफवली बौद्धवाडी येथील रिक्षाचालक विजय पांडुरंग कांबळे (वय ६२) हे आपल्या MH-08 AO-2191 क्रमांकाच्या रिक्षासह देवळे फाटा येथे नेहमीप्रमाणे प्रवाशांची प्रतीक्षा करत उभे होते. त्याचवेळी मागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली.

या धडकेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, पुढे बसलेले कांबळे हे रिक्षाबाहेर फेकले जाऊन रस्त्यावर फरपटत गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका तीव्र होता की रिक्षा सुमारे दहा फूट पुढे ओढली गेली. धडक दिल्यानंतर संबंधित वाहनचालकाने वाहन रिव्हर्स घेऊन कोल्हापूरच्या दिशेने पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. हे वाहन काळ्या रंगाचे स्कॉर्पिओसदृश असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेच्या वेळी संदीप कांबळे हे जवळच होते; मात्र ते क्षणभर बाजूला गेल्याने संपूर्ण घटना त्यांच्या नजरेस पडली नाही. जखमी अवस्थेत कांबळे यांना तातडीने देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला.

अपघाताची माहिती मिळताच देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस निरीक्षक प्रमोद वाघाटे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT