bauxite mine, प्रातिनिधी छायाचित्र 
रत्नागिरी

Bauxite mining opposition: सागवेतील बॉक्साइट उत्खननाविरोधात रविवारी सर्वपक्षीय जनसभा

Ratnagiri news: भूमी, जल, पर्यावरण व शेतीच्या संरक्षणासाठी एकजुटीचे आवाहन...

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : सागवे परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साइट खनिज उत्खननाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला सर्वपक्षीय तसेच सर्व स्तरातून तीव्र विरोध दर्शविण्यासाठी रविवारी (दि. ३० ऑगस्ट) दुपारी २.३० वाजता सागवे येथील जनता विद्यालयात सर्वपक्षीय विरोध सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती ठाकरे शिवसेनेचे राजापूर तालुका प्रमुख कमलाकर कदम यांनी दिली.

सागवे परिसरातील जमीन, पाणीस्रोत, पर्यावरण, शेती तसेच आगामी पिढ्यांच्या भवितव्यावर बॉक्साइट उत्खननामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत या सभेत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सभेस सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ, शेतकरी, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

'ही लढाई कोणत्याही एका पक्षाची नसून गावाच्या अस्तित्वाची आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याची आहे,' अशी भूमिका आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. बॉक्साइट उत्खननाला सर्वपक्षीय विरोधाची दिशा निश्चित करण्याबरोबरच पुढील आंदोलनाची भूमिका या सभेत ठरण्याची शक्यता आहे. बॉक्साइट उत्खननाला विरोध करताना सागवेची भूमी, जलसंपदा, पर्यावरण आणि शेतीचे संरक्षण करण्यासाठी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन कमलाकर कदम यांनी सर्वाना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT