Water Crisis  
रत्नागिरी

Ratnagiri Water Crisis | जिल्ह्यातील पाणी टंचाईची दाहकता वाढली

Ratnagiri Water Crisis | जिल्ह्यातील पाणी टंचाईची दाहकता वाढली

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सहा तालुक्यात तथ्यत १५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील ३२ गावांतील ७८ वाहयात ६९२ टँकरच्या फेल्या होत आहे. पाणीटंचाईने तब्बल २७ हजार ८३२ लोक बाधित झाली आहेत. लांजा, राजापूर, गुहागर या तीन तालुक्यात अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही. एप्रिलचा महिना संपत आला असून पाण्याची दाहकता वाढत चालली आहे. दिवसेंदिवस नया, धरणातील पाणी आटत वालले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मीठी कसरत करावी लागत आहे.

९ तालुक्यापैकी ६ तालुक्यांत १५ टँकरने पाणीपुरवठा सुरु झाला आहे. दिवसेंदिवस पाण्याच्या झळा लागू लागल्या आहेत, रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, चिपळूण, खेड, आणि रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक पाण्याची टंचाई भासत असून गावा-गावात, वाडी वस्त्यात टैंकरने पाणीपुरवता रण्यात येत आहे. १२ खासगी तर ३ शासकीय टँकरने सध्या पाणीपुरवठा सुरू आहे

या गावे, वाड्यांना पाणी पुरवठा...

रत्नागिरी- शिरगाव राधाकृष्णनगर तिवंडेवाडी, स्वरूपानंदनगर अजमेरीनगर, आझाद नगर, राजनगर, प्रशांत नगर, नायाबनगर, लक्ष्मीनगर, साईभूमीनगर, सडामिन्या-चौसोपीबाडी, गवाणवाडी, मचलावठार, खालचावठार, आनंद नगर, मिन्याबंदर, खालगाव-बौध्दवाडी, मधील गोताडवादी, काकादेवी बाजारपेठ, मेी-वरची म्हादवेवाडी, विठलवाडी, मिरजोळे-मधलीवाडी, भक्ती कुंज, एलिना, स्मीत प्रभा. नाचणे आदिनाथ नगर, सोमेश्वर- पांळदेवाही, गुरववाडी, खेडशो नवाथे, श्रीनगर, एकतानगर, गणेशनगर, लक्ष्मीनारायणन, मथुरापार्क, सरस्वतीनगर, सौम्यापार्क.

मंडणगड तालुक्यातील वाल्मीकी नगर, कौडगाव, भोळवळी देवाचा डोंगर, खेड-बोरटोक, बंगळा, खालची धनगरवाडी, बरची धनगरवाडी, भराडेवाडी, धनगरवाडी, भोसलेवाडी, मांगलेवाडी, धनगरवाडी, बोरवाडी, पालांडेवाडी, खांडेकरवाडी, वनगरवाडी, बौध्दवाडी, चिपळूणमधील डेरवण-धनगरवाडी, चव्हाणवाडी, कुडप धनगरवाडी, कातळवाडी, मधालीवाडी, अनारी-धनगरवाडी, कोंडमळा-धनगरवाडी, नारळेवाडी, मोकासवाडी, गंगेचेवडी, जुनावडेवाडी, राडेवाडी, अडरे-धनगरवाडी, सावर्डे-धनगरवाडी, टेरव-चनगरवाडी. संगमेश्वर तालुक्यातील दंडगवळवाडी, धनगरवाडी, नोरदवाडी, जखीनटेप, सहाणेचीवाडी, दापोलीतील कोळीवाडा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT