आरोपीं समवेत देवरुख पोलिस (Pudhari Photo)
रत्नागिरी

Sangameshwar Crime | साडवली वनाज कंपनीत सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न उधळला; ४ जणांना अटक

देवरुख पोलिसांची कामगिरी, न्यायालयाने या चौघांना चार दिवस पोलीस कस्टडी सुनावली

पुढारी वृत्तसेवा

Sadavali Vanaz company theft attempt

साडवली: संगमेश्वर तालुक्यामध्ये चोरीचे सत्र सुरु असतानाच संगमेश्वर -देवरुख राज्य मार्गावरील साडवली येथील वनाज कंपनीत अज्ञातांनी सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास करण्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरट्याने तात्काळ पलायन केले. मात्र, चोरट्याने सोडलेला पुरावाच पोलीस तपासात महत्त्वाचा ठरला आणि गुन्हा दाखल होताच देवरुख पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. चार जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने या चौघांना चार दिवस पोलीस कस्टडी सुनावली आहे.

याबाबतची फिर्यादी विलास दामोदर पुरोहित (वय ७२, रा. सायले शिंदेवाडी, ता. संगमेश्वर) यांनी दिली. यावरुन शुभम संजय जोयशी (वय १८, रा.कोंडगाव जोयशीवाडी), दिपक सुभाष गुरव (वय ३३, बोंड्ये भेरेवाडी), आदित्य बळीराम भेरे (वय २४, बोंड्ये भेरेवाडी), प्रदीप चंद्रकांत गुरव (वय २६, बोंड्ये गुरववाडी ता. संगमेश्वर) यांच्यावर देवरुख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार ११ नोव्हेबर रात्री पासून १२ नोव्हेबर सकाळी ०७.४५ वा. चे मुदतीत वनाज इंजिनियर्स लिमि.कंपनी साडवली येथे घडला आहे. यातील आरोपींनी वनाज इंजिनियर्स लिमि. साडवली या कंपनीच्या भिंतीवरुन खाली उतरुन कंपनीचे गॅस बँक येथील लोखंडी दरवाज्या मधुन आत प्रवेश करुन नुमद वर्णनाचे व किंमतीचे जंक्शन ब्लॉक त्यामध्ये फोजिंग, ड्रम, कट असे स्पेअर पार्ट दातार ट्रेडर्स साखरपा नाव असलेले १४ गोणत्याचे पोत्यामध्ये भरुन सुमारे २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा एवज कंपनी मधुन चोरुन नेण्याचा प्रयत्न केला.

यातील चोरट्यांना देवरूख पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडील २ लाख ४५ हजार रु. किंमतीचे जंक्शन ब्लॉक त्यामध्ये फोजिंग, ड्रम, कट असे सुमारे १३०७ स्पेअर पार्ट भरलेली सुमारे ४६५ किलो वजनाची एकुण १४ गोणत्याची पोती असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोत्यांवर दातार ट्रेडर्स साखरपा असे लिहिलेले असल्याने चोरट्यांचा माघ काढणे देवरूख पोलिसांना सोयीचे झाले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, देवरुखचे निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, सचिन पवार, अभिषेक वेलवणकर, आर्या वेलवणकर, सचिन लोकरे यांच्या पथकाने केली. चोरीचा गुन्हा करणाऱ्या चौघांनाही देवरूख न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT