रत्नागिरी : शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांची जिल्हा नियंत्रण कक्ष येथे पोलिस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी आता शहर पोलिस निरीक्षक म्हणून पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक पाटील हे यापूर्वी सागरी सुरक्षा पथकाचे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.
सतीश शिवरकर यांची पालघरहून रत्नागिरी पोलिस निरीक्षक पदी सात महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. या काळात त्यांनी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यात तसेच मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकाम तोडतानाचा बंदोबस्त करताना चोख कामगिरी पार पाडली होती. तसेच शहरातील 13 जणांना तडीपार करण्यात, तीन घरफोड्या उघड करण्यात त्यांना यश आले.
संवेदनशील घटना घडल्यानंतर घटनास्थळावर तातडीने पोहचल्यावर पुढील दुष्परिणाम टळू शकतात. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक साधे भोळे आहेत पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर ते रागवतात. परंतू आदरपूर्वक वागणूक दिली तर नागरिकही पोलिसांना संपूर्ण सहकार्य करतात असे सतीश शिवरकर यांनी सांगितले.