St Bus : दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी विविध मार्गांवर जादा बसेस सेवा (source- MSRTC)
रत्नागिरी

Ratnagiri Electric Buses : नव्या वर्षात धावणार नवीन लालपरी, ई-बसेस

प्रवाशांचा होणार आरामदायी प्रवास

पुढारी वृत्तसेवा

जाकीरहुसेन पीरजादे

रत्नागिरी: रत्नागिरी विभागात एसटी विभागाचे विभागाचे कामकाजात सूसुत्रपणा आलेला असून जिल्ह्यात स्मार्ट बसेस आल्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करावयास मिळत आहे. दरम्यान, दापोलीनंतर रत्नागिरी, खेड, चिपळूण येथील चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. नव्या वर्षात आणखी लालपरी लिहिलेल्या स्मार्ट बसेस, तब्बल 35 ई-बसेस रत्नागिरी शहराच्या रस्त्यावर धावणार आहेत.

तसेच ग्रामीण भागासाठी मिनी बसेसही येणार आहेत. रत्नागिरी नवीन बसस्थानक, रहाटाघर, चिपळूण, पाली, खेडनंतर उर्वरित राजापूर, लांजा, संगमेश्वरसह विविध बसस्थानकाचे रूपडे पालटणार असून बसस्थानकाचे काम सुरू आहे. पूर्वी रत्नागिरी शहरातील बसस्थानक रहाटाघर येथे सुरू होते. शहराचे बसस्थानकही मोडकळीस आले होते. मात्र त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे रत्नागिरी शहरात सुसज्ज असे नवीन बसस्थान उभारण्यात आले आहे. तसेच 9 तालुक्यापैकी काही बसस्थानके नवीन बांधण्यात आली तर उर्वरित बसस्थानकांचे कामकाज अंतिम टप्प्यावर आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ई-बसेस कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात दापोली येथील चार्जिंग स्टेशनचे कामपूर्ण झाले असून त्यामार्गावर ई-बसेस धावण्यास सुरूवात झाली आहे. रत्नागिरीसह चिपळूण, खेड येथील चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यावर आले असून लवकरच पूर्ण झाल्यास प्रवाशांना ई-बसेसमध्ये प्रवास करण्यास मिळणार आहे.चिपळूणमध्ये साध्याबसेसला सीएनजी बसेसमध्ये परिवर्तन करण्यात आले असून त्याबसेस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. रत्नागिरी शहरात ही सीएनजी आधारित बसेस धावणार असून त्याचे काम सुरू झाले आहे. तसेच ग्रामीण भागात, दुर्गम, खेड्यापाड्याच्या शेवटच्या टोकापर्यंत एसटी बसेस धावणार असून लवकरच मिनी बसेस रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत.

एकंदरीत, मागील वर्षभरात नवीन बसस्थानके, दिवाळी, गणेशोत्सव, पंढरपूरच्या वारीत रत्नागिरी विभागाच्या शेकडो गाड्या धावल्यामुळे रत्नागिरी विभाग मालामाल झाले तसेच शैक्षणिक सहलीत ही रत्नागिरी विभागाने आघाडी घेतली असून सर्वातिध उत्पन्नात राज्यात तिसरे विभाग ठरले आहे. ज्येष्ठ नागरिक,महिलांना तिकीटात सवलत दिल्यामुळे एसटी विभागास अच्छे दिन आले असून प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यार्थ्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून त्याचे निरंसन करण्यात येत आहे. काही अपघातात एसटीचे नुकसान झाले, तसेच शालेय मुलींसाठी एसटी आगारप्रमुखांच्या उपस्थितीत पासचे वाटप करण्यात आले. स्वच्छ सुंदर बसस्थानकात रत्नागिरी शहरासह चिपळूण, खेड या बसस्थानकास अ मानांकन मिळाले आहे. उर्वरित बसस्थानकास ब, क मानांकन मिळाले आहे.

शहर बससेवेला हवी उर्जितअवस्था

रत्नागिरी शहरातील बससेवेला अच्छे दिन आणण्यासाठी प्रयत्नहोणे गरजेचे आहे. सध्या रत्नागिरी शहर बससेवा तोट्यातच आहे. शहरासाठी चांगल्या नवीन बसेस, कर्मचारी भरती, शहर बससेवा चालवण्यासाठी नगरपरिषद प्रशासन किंवा खासगीकरणाला कंत्राटी दिल्यास तरच अच्छे दिन येतील. तसेच आणखीन उत्पन्नासाठी बसेसवर जाहिराती, रत्नागिरी शहर, जिल्ह्यातील पर्यटनासाठी विशेष बस ठेवल्यास उत्पन्नात भर पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT