Crime News Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Crime | रत्नागिरी : कुवारबाव येथील तरुणाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक

कुवारबाव येथील साईनगर परिसरात सात बंगल्याच्या मागे एका तरुणाचा कोयत्याने वार करून खून

पुढारी वृत्तसेवा

Ratnagiri Kuwarbav Youth Killed

रत्नागिरी : शहरालगतच्या कुवारबाव येथील साईनगर परिसरात सात बंगल्याच्या मागे एका तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 21 ) रात्री घडली. सूरज राजाराम झोरे (वय 25, मूळ रा. नायरी, ता. संगमेश्वर; सध्या रा. विरार, मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.

सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड आणि नजीबूल शेख उर्फ सोनू (तिघांचेही पूर्ण पत्ते उपलब्ध नाहीत) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत मृत सूरजची बहीण नंदा रमेश फाले (वय 32, रा. राजेंद्र कॉम्प्लेक्स, तिरुपती बिल्डिंग, दहिसर, मुंबई) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सूरज झोरे हा काही कामानिमित्त रत्नागिरीत आला होता. गुरुवारी रात्री 9.30 ते 10.53 वाजण्याच्या दरम्यान साईनगर येथील सात बंगल्याच्या मागील भागात संशयित तिघांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्याच्या मानेवर व हातांवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले.

जखमी अवस्थेत सूरजला जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि. 22 मे) दुपारी सुमारे 2.30 वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश शिंदे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT