लोटे औद्योगिक वसाहत येथील डॉ. खान कंपनीत भीषण स्फोट झाला  Pudhari
रत्नागिरी

Khed Factory Blast | खेड लोटे एमआयडीसीतील डॉ. खान कंपनीत भीषण स्फोट; कामगार जखमी

Ratnagiri News | जखमींना घाणेखुंट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

Workers Injured in Lote MIDC

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत येथील डॉ. खान कंपनीत शुक्रवारी (दि.६) भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोटानंतर कंपनी परिसरात आग लागल्याने काही कामगार आगीने होरपळले असून त्यांना तातडीने उपचारासाठी घाणेखुंट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंपनीतील उत्पादन प्रक्रियेदरम्यान अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, परिसरातील इतर कारखान्यांनाही जोरदार हादरा बसला. त्यामुळे आसपासच्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, जखमी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून संबंधित यंत्रणेकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. अधिक माहिती प्रतीक्षेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT