खेड : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर मांजलेकर हॉटेलसमोर 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता झालेल्या मोटार अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
कळंबणी बद्रक (ता. खेड) येथील रहिवासी रामचंद्र बाबू गरव (64) हे त्यांच्या ताब्यातील सुजुकी बर्गमॅन दुचाकी (क्रमांक एमएच 08 बी जी 8298) ने कळंबणीहून भरणेच्या दिशेने जात असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने (क्रमांक एमएच 43 बी वाय 7512) जोरदार धडक दिली. ही कार आस्वाद सुभाष बल्लाळ (वय 32, रा. नवी मुंबई) चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. धडकेमुळे रामचंद्र गरव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोन्ही पायांनाही इजा झाली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कळंबणी बद्रक येथील पोलिस पाटील नरसिंह दिनकर सुतार (57) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.