Crime News pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri |अमली पदार्थ विरोधी कारवाईत 6 आरोपींना २ वर्षासाठी हद्दपार

Ratnagiri drug case externment|अमली पदार्थ विरोधी कारवाईत 6 आरोपींना २ वर्षासाठी हद्दपार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरात अमली पदार्थ विरोधी कारवाईत 6 आरोपीना २ वर्षासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्ड वरील आरोपी नजफ आसिफ मिरजकर (रा. गवळीवाडा रत्नागिरी), मस्तान मगदूम शेख (रा. खान कॉम्प्लेक्स मच्छी मार्केट, बाजारपेठ रत्नागिरी), अब्दुल रौफ इकबाल डोंगरकर (रा. कर्ला उर्दू शाळेजवळ रत्नागिरी), सचिन राजाराम महापुस्कर (रा. गवळीवाडा, फुरकान यासिन फणसोपकर रा. मजगाव रोड रत्नागिरी) आणि अरमान लियाकत धामस्कर (रा. साईभूमी नगर, रत्नागिरी) नमूद इसमाविरुद्ध सन 2025 मध्ये हद्दपार प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते.

त्यांच्या विरुद्ध आज मंगळवार 29 सप्टेंबर रोजी उपविभागीय दंडाधिकारी रत्नागिरी विभाग यांनी हद्दपारचे आदेश पारित केलेले आहेत. त्याना दोन वर्षासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT