Ratnagiri Froud : १ टक्का व्याजाच्या आमिषाने ४५ जणांना गंडा

१ लाख भरा, १ कोटी कर्ज घ्या; गणेशगुळे फाट्यावर पैसे वाटल्याच्या चर्चेने खळबळ
fraud case |
१ टक्का व्याजाच्या आमिषाने ४५ जणांना गंडाPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : ‘फक्त १ लाख रुपये भरा आणि अवघ्या १ टक्का व्याजदराने तब्बल १ कोटी रुपयांचे कर्ज मिळवा’, असे आमिष दाखवून रत्नागिरीतील अनेक नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तब्बल ४० ते ४५ नागरिक अडकल्याची माहिती असून, काहींना ४ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. याबाबत फसवणूक झालेल्या नागरिकांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून, या प्रकरणामागे मोठे आर्थिक रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, कर्ज प्रकरण मंजूर करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेने त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने प्रत्येकी १ लाख रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर महिनाभराचा कालावधी उलटला तरी कर्ज मंजूर झाले नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधितांकडून वारंवार नवीन तारखा देऊन वेळ मारून नेण्यात आली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. चार दिवसांपूर्वी गणेशगुळे फाट्यावर मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद पद्धतीने पैसे वाटपाचा कार्यक्रम झाल्याचा दावा काही तक्रारदारांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून या दाव्याची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. त्यावेळी संबंधित महिलेकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. पोलिसांकडे तक्रार केल्यास अथवा १५ कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराबाबत माहिती दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा धाक दाखवण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तसेच खोटी कागदपत्रे व धनादेश तयार करून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या कथित आर्थिक व्यवहारात एका रिक्षेचा वापर करण्यात आल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news