Ratnagiri roads and bridges fund 
रत्नागिरी

Ratnagiri roads and bridges fund |दिवाळीत रत्नागिरीच्या रस्ते-पुलांसाठी १३८ कोटींचा निधी !

सार्वजनिक बांधकाम विभागाला चार लेखाशीर्षांखाली अनुदान; ठेकेदारांना निधी वितरणाची प्रक्रिया सुरू

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांच्या विकासकामांना मोठी आर्थिक तरतूद उपलब्ध झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला विविध चार तब्बल १३८ कोटी १५ लाख ८२ हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. या निधीचे संबंधित ठेकेदारांना वितरण करण्याची प्रक्रियाही सुरू झाली असून, त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. या निधीमध्ये ग्रामीण भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रमुख जिल्हा मार्गाच्या कामांसाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे.

चिपळूण विभागाला ४३ कोटी ८० लाख ५१ हजार, तर उत्तर रत्नागिरी विभागाला ४४ कोटी ६३ लाख ७१ हजार रुपये मिळाले आहेत. अशा प्रकारे प्रमुख जिल्हा मार्गाच्या कामांसाठी एकूण ८८ कोटी ४४ लाख २२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. प्रमुख जिल्हा मार्गावरील पुलांच्या कामांसाठीही निधी देण्यात आला आहे. चिपळूण विभागाला ४ कोटी ७३ लाख ३६ हजार, तर उत्तर रत्नागिरी विभागाला १५ कोटी ८ लाख २ हजार रुपये वर्ग झाले आहेत. एकूण १९ कोटी ८१ लाख ३८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राज्य मार्गाच्या बांधकामासाठी चिपळूण विभागाला ४ कोटी ६ लाख ९६ हजार, तर उत्तर रत्नागिरी विभागाला ११ कोटी ६० लाख २८ हजार रुपये मिळाले आहेत. या कामांसाठी एकूण १५ कोटी ६७ लाख २४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. राज्य मार्गावरील पुलांच्या कामांसाठी चिपळूण विभागाला २ कोटी ९४ लाख ४७ हजार, तर उत्तर रत्नागिरी विभागाला ११ कोटी २८ लाख ५१ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. या कामांसाठी एकूण १४ कोटी २२ लाख ९८ हजार रुपयांची तरतूद आहे.

चिपळूणपेक्षा उत्तर रत्नागिरीला अधिक निधीविभागनिहाय विचार करता, चिपळूण विभागाला मिळून ५५ कोटी ५५ लाख ३० हजार रुपये, तर उत्तर रत्नागिरी विभागाला ८२ कोटी ६० लाख ५२ हजार रुपये वर्ग झाले आहेत. दोन्ही विभागांचा एकत्रित निधी १३८ कोटी १५ लाख ८२ हजार रुपये इतका आहे. निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याने प्रलंबित रस्ते आणि पुलांच्या कामांना आर्थिक बळ मिळणार आहे. ग्रामीण भागातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी या निधीचा विनियोग महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, निधी प्रत्यक्ष कामांवर किती वेगाने खर्च होतो आणि कामे निर्धारित वेळेत पूर्ण होतात का, याकडे आता लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT