Ratnagiri School Rankings  
रत्नागिरी

Ratnagiri School Rankings | जिल्हा शाळा मूल्यांकनात आघाडीवर

आतापर्यंत २ हजार १५३ शाळांचे मूल्यांकन पूर्ण; ८१३ शाळांचे काम प्रलंबित

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी: जाकीर हुसेन पिरजादे

शाळांच्या शैक्षणिक व भौतिक गुणवत्तेचे मोजमाप करण्यासाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (स्क्वाफ) प्रक्रियेत रत्नागिरी जिल्ह्याने आघाडी घेतलेली आहे. आतापर्यंत ७२ टक्के काम पूर्ण झाले असून २७ टक्के काम शिल्लक आहे. २ हजार १५३ शाळांचे मूल्यांकन पूर्ण असून ८१३ शाळांचे मूल्यांकन बाकी आहे. कोल्हापूर, सातारा, चंद्रपूर या जिल्ह्यांनी ८५ टक्क्यांपेक्षा जास्त मूल्यांकन केले आहे.

दरम्यान, राज्यातील ६७ हजार ४५५ शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केले आहे तर ४० हजार ६३७ शाळांनी अद्याप १०० टक्के स्वयंमूल्याकनाचे काम पूर्ण केले नसल्याचे आढळून आले आहे. मूल्यांकनातून विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळीचा आढावा घेऊन सुधारणा उपाय सुचवले जातात

अध्यापन, शालेय वातावरण, सुरक्षितता, पालक सहभाग व नेतृत्व सुधारल्याने शाळेचा कारभार गुणवत्तापूर्ण होतो. दरम्यान, जिल्ह्यात एकूण २९६६ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. जिल्ह्याने आतापर्यंत 2 हजार १५३ शाळांचे मूल्यांकन पूर्ण केले आहे. उर्वरित २७ टक्के काम बाकी असून मूल्यांकनाच्या कामात आघाडी घेतलेली आहे. दरम्यान, आता शिक्षण कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, शिक्षकांवर २४ एप्रिलपर्यंत बीएलओ, डयूटी, दहावी-बारावी पेपर तपासणी व वार्षिक परीक्षा यांचा ताण असल्याने शाळा गुणवत्ता मूल्यांकन प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याचे शिक्षक व मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील मूल्यांकनाचे काम रखडले आहे. मूल्यांकन कामासाठी शाळांना १ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगण्यात आले. हे आहेत फायदे मूल्यांकनामुळे शिक्षकांच्या अध्यापन पध्दतीत सुधारणा करण्याची संधी मिळते. विद्यार्थी केंद्रित शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करता येते. पालक-शिक्षक यांच्या समन्वय वाढतो.

आकडे बोलतात.... -

जिल्ह्यातील एकूण शाळा २९६६ - मूल्यांकन पूर्ण शाळा २१५३ - शिल्लक शाळा ८१२ - ७२ टक्के काम पूर्ण -२७ टक्के शिल्लक

हे आहेत सर्वोत्तम जिल्हे...

रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, कोल्हापूर, गडचिरोली, अहिल्यानगर, नाशिक, धाराशिव, रत्नागिरी, अकोला. मध्यम जिल्हे नदिड, पुणे, इाणे, रायगड, धुळे, मुंबई, सांगली, सिंधुदुर्ग, जळगाव, धुळे, अमरावती यासह अन्य जिल्हे. अत्यंत संथ-वाशिम, हिंगोली, पालघर, लातूर, परभणी, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT