72 Hour Mango Damage complaint - आंबा नुकसानीची ७२ तासांत तक्रार करा

विमा कंपनीस टोल फ्री १४४४७ वर तक्रार करता येणार; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची माहिती
72 Hour Mango Damage complaint
72 Hour Mango Damage complaint
Published on
Updated on

रत्नागिरी : फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेगाचे वारे २५ कि. मी. प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासात विमा कंपनीस टोल फ्री क्र.१४४४७ वर किंवा कृषी विभागास तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये आंबा व काजू पिकासाठी भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात फळ पीक विमा योजनेत आंबा पिकासाठी एकूण ३० हजार ८४२ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतलेला आहे.

संभावित हवामान धोके महसूल मंडळनिहाय स्थापित केलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वेगाचा वारा, आर्द्रता इ. माहिती स्वयंचलितरित्या नोंदवली जाते. या माहितीच्या आधारे शासन निर्णयामध्ये निर्धारित केलेल्या कालावधीत हवामान धोके लागू झाल्यानंतर विमाधारक शेतकरी यांना नुकसान भरपाई लागू होते. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे बाताबरण झाले असून वेगाचे वारे २५ कि.मी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकाचे नुकसान झाले असल्यास फळपीकविमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासात विमा कंपनीस/कृषी विभागास तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.

72 Hour Mango Damage complaint
Ratnagiri | केळशीतील वाळूच्या टेकडीचे अस्तित्व धोक्यात !

संबंधित विमा कंपनी, महसूल विभाग व कृषी विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल, विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार दाखल न केल्यास फक्त संदर्भहवामान केंद्रावरील वेगाच्या वाऱ्याची नोंद ही नुकसानभरपाईसाठी पात्र होणार नाही.

विमा परतावा मिळण्यासाठी आवश्यक हवामान प्रमाणके

▶ आंबा पिकासाठी वेगाचा वारा १६ एप्रिल ते १५ मे २५ कि. मी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त (नुकसान झाल्यास ७२ तासात विमा कंपनीस/कृषी विभागास तक्रार करणे आवश्यक) ▶ १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग २५ कि. मी. प्रति तास राहिल्यास नुकसानभरपाई २०,०३६ रुपये प्रति हेक्टर देय राहील. ▶ १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग २५ कि. मी प्रति तासपेक्षा जास्त राहिल्यास नुकसानभरपाई ३४,००० रुपये प्रति हेक्टर देय राहील

72 Hour Mango Damage complaint
Ratnagiri | आता लक्ष पंचायत समिती गणांच्या आरक्षणाकडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news