प्रातिनिधिक छायाचित्र  File Photo
रत्नागिरी

दापोलीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात पती-पत्नी गंभीर जखमी

Ratnagiri Gas Cylinder Blast | घराचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

जालगाव: पुढारी वृत्तसेवा : दापोली शहरातील रूपनगर इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊ पती-पत्नी गंभीर भाजले. घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना आज (दि. 3) दुपारी 2:30 च्या सुमारास घडली. याबाबत दापोली पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

याबाबत मिळालेल्या घटनास्थळ व दापोली उपजिल्हा रुग्णालयामधून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश श्रीकांत शिर्के (वय 35, रा. रुपनगर) हे दापोली शहरातील एचपी गॅस वितरण कंपनीत नोकरीला आहेत. काही वर्षांपासून घरोघरी सिलेंडर पोहोचविण्याचे काम ते करतात. आज दुपारी दोनच्या सुमारास ते घरी आले होते. यादरम्यान त्यांच्या पत्नी अश्विनी अविनाश शिर्के (वय 30) यांनी गॅस लिक झाल्याचे अविनाश यांना सांगितले. त्यावेळी गॅस लिक झाल्याचा वास कुठून येतो, याची त्यांनी पाहणी केली. परंतु, याच वेळेस घरात लाईट टीव्ही चालू होती. काही कळायच्या आतच घरात मोठा स्फोट झाला. त्यामध्ये पती-पत्नी भाजले. त्यांना समाजसेविका संपदा पारकर व काहींनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे उपचारासाठी दाखल केले. यावेळी तपासांती त्यांना ऐकू येणे बंद झाल्याने डॉक्टर मोमीन यांनी सांगितले.

दरम्यान, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घराची एक भिंत कोसळली आहे. तर घरातील सोफा, टीव्ही व अन्य काही वस्तू जळाल्या आहेत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अविनाश शिर्के यांची दोन्ही मुले शाळेत गेल्याने मोठा अनर्थ टळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT