Lanja Rape Case Verdict
रत्नागिरी : लांजा तालुक्यात शेजारी राहणाऱ्या नात्यातीलच अल्पवयीन मुलीला घरी जेवण बनवण्यासाठी बोलावून तिच्यावर जबरदस्तीने वारंवार अत्याचार केला. यात पीडिता 6 महिन्यांची गरोदर राहिली. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने मंगळवार 20 जानेवारी रोजी 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना सन 2022 मध्ये घडली आहे.
साहिल दत्ताराम मसणे (वय 21, रा. पन्हळे मसणेवाडी लांजा, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सन 2022 मध्ये त्याने घराशेजारीच नात्यातील अल्पवयीन मुलीला आपल्या घरी जेवण बनवण्याच्या बहाण्याने 4 ते 5 वेळा बोलावून तिच्यावर आपल्या घरी व काही वेळा पिडीतेच्या घरी जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले. तसेच याबाबत कोणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, पीडिता 6 महिन्यांची गरोदर राहिल्याची बाब तिच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी साहिल विरोधात लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस्विनी पाटील यांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल दाखल केला होता. याप्रकरणी तपास करुन त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल ॲड.मेघना नलावडे यांनी 11 साक्षिदार तपासत युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद जिल्हा सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी ग्राह्य मानला. त्यांनी आरोपी साहिलला 20 वर्ष सक्तमजूरी 2 हजार दंड,(8) मध्ये 3 वर्ष शिक्षा व 500 दंड कलम (12) नुसार 1 वर्ष शिक्षा व 500 दंड अशी एकूण 20 वर्ष सक्तमजुरी आणि 11 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दंडातील 7 हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आरोपी हा गुन्हा घडला त्यावेळी 21 वर्षांचा असल्याने त्याच्या वकिलांतर्फे न्यायालयात त्याला अपराधी परिविक्षा अधिनियम 1958 (6) ची सवलत मिळावी, अशी मागणी केली होती. परंतू आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर व घृणास्पद असल्यामुळे त्याची विनंती न्यायालयाने नामंजूर केली.