रत्नागिरी : रिक्षा पुढे घेण्यास सांगितल्याच्या रागातून तरुणाला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केल्याप्रकरणी रिक्षा चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.15 वा.सुमारास प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या बाजूला घडली.
याबाबत रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेहान गुणी मुल्ला (28, रा. निलकंठ कॉम्प्लेक्स मच्छीमार्केट, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रविवारी सायंकाळी तो आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एवाय-7776) वरून मिरकरवाडा ते रत्नागिरी असा येत होता. तो प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथील पान स्टॉलवर पान घेण्यासाठी थांबला होता.
पानाची ऑर्डर देउन तो लघुशंकेसाठी जात असताना वाटेत उभ्या असलेल्या रिक्षा चालकाला त्याने रिक्षा पुढे घेण्यास या गोष्टीचा राग आल्याने त्या अज्ञात रिक्षा चालकाने रेहानला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. यात रेहानच्या कपाळावर आणि डोक्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.