रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी सुरूच्या बनात तब्बल 37 लाखांचा 9 किलो चरस हा अंमली पदार्थ बेवारस स्थितीत मिळून आला. ही घटना बुधवार 24 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वा. उघडकीस आली. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद कांबळे यांनी अज्ञाता विरोधात तक्रार दिली आहे.
बुधवारी सायंकाळी गावखडी समुद्रकिनारी तेथील नागरिकांना अंमली पदार्थ सदृश्य पदार्थ दिसून आला. त्यांनी तातडीने याची माहिती पूर्णगड पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या पदार्थाची तपासणी केली असता, त्यांना 9 किलो 216 ग्रॅम वजनाचा चरस (हशिश) हा अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. हा अंमली पदार्थ विक्रीसाठी अज्ञाताने या ठिकाणी आणला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या प्रकरणी अज्ञाता विरोधात पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.
हेही वाचा :