Ratnagiri Bus Accident
रत्नागिरी: कुडोशी येथे बस उलटून दोन विद्यार्थिंनी जखमी झाल्या. Pudhari News Network
रत्नागिरी

रत्नागिरी: कुडोशी येथे बस उलटली; दोन विद्यार्थिंनी जखमी

पुढारी वृत्तसेवा

खेड : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खेड - आंबवली मार्गावर वडगाव च्या दिशेने जाणारी एसटी बस अचानक समोर गायी आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. ही घटना आज (दि. १८) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कुडोशी येथे घडली.

या अपघातात दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यांना शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे व स्थानिक ग्रामस्थांनी कलंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. बस मधील प्रवाशांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने चालक व वाहक यांनी बाहेर काढले.

SCROLL FOR NEXT