.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
खेड : तालुक्यातील साखरोली गावातील अस्लम शहा यांच्या घराजवळील डोंगर भागातून रविवारी दि.14 रोजी अतिवृष्टी सुरू असताना मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.
हा प्रकार घडताना शहा कुटुंबाने तो मोबाईलमध्ये चित्रित केल्याने घडलेला प्रकार अनेकांपर्यंत समाज माध्यमांमुळे पोहोचला. तालुक्यात गेल्या चोवीस तासांत ढगफुटीसद़ृश 235.70 मिलिमीटर पाऊस पडला. तालुक्यातील साखरोली या गावातील मोहल्यात अस्लम शहा यांच्या घराजवळ असलेला डोंगर रविवारी अचानक पुढे सरकला. त्यामुळे हे द़ृश्य पाहताना शहा कुटुंबातील सदस्यांच्या काळजाचा ठोका चुकला. यावेळी झालेल्या भूस्खलनाने या कुटुंबाचे काहीअंशी नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणाही व्यक्तीला इजा पोहोचलेली नाही.