तहसिल कार्यालय मंडणगड pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri News : फेरफार नोंदणीसाठी लाच घेतल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह दोघांविरोधात 'लाचलुचपत प्रतिबंधक'ची कार्यवाही

Bribery case: शेनाळे येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Government officer caught bribery

मंडणगड : शेनाळे येथे लिलावामध्ये खरेदी केलेल्या शेतजमीनीचा फेरफार नोंद करुन तसा सातबारा उतारा देण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी मंडळ अधिकारी म्हाप्रळ अमित शिगवण, म्हाप्रळ ग्राम महसुल अधिकारी (अतिरीक्त कारभार सोवेली सजा) श्रीनिवास श्रीरामे, व उपकोषागार कार्यालय मंडणगड येथील शिपाई मारुती भोसले यांना लाचलुचपत विभागाने तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. 27 मे 2025 रोजी सांयकाळी सव्वासहा वाजण्याचे सुमारास तहसिल कार्यालय मंडणगड चे आवारात ही कार्यवाही करण्यात आली.

या संदर्भात लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहीतीनुसार, सातबारा उतारा संबंधित मंडळ अधिकारी तलाठी यांच्याकडून करून देतो असे सांगून या कामाकरिता मारुती भोसले यांनी तक्रारदार यांच्याकडून पन्नास हजार रुपये रकमेची मागणी केली अशी तक्रार तक्रारदाराने केली आहे. तक्रार देण्यापूर्वी यापैकी 45 हजार रुपये मारुती भोसले याने ऑनलाइन स्वीकारले, परंतु फेरफार नोंद मंडळ अधिकारी यांनी पूर्ण रक्कम न मिळाल्याने रद्द केल्याने आज दि. 27 मे 2025 रोजी मंडळ अधिकारी अमित शिगवण, श्रीनिवास श्रीरामे व मारुती भोसले यांच्या समक्ष भेट घेतली. तेव्हा फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अमित शिगवण यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रलंबित काम पूर्ण करून देण्यासाठी आज दिनांक 27 मे 2025 रोजी पडताळणी दरम्यान तीस हजार रुपये लाच रकमेची मागणी केली.

तक्रारदार यांच्याकडून मारुती भोसले याने तीस हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. त्यातील स्वीकारलेल्या लाच रकमेतील स्वतःचा हिस्सा 15500 रुपये स्वतःसाठी ठेवून उर्वरित 14500 रुपयांचा हिस्सा तलाठी श्रीनिवास श्रीरामे यांना दिला. म्हणून तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारली त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. मंडळ अधिकारी अमित शिगवण, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे व शिपाई मारुती भोसले यांना पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईत अँटी करप्शन ब्युरो, ठाणे चे पोलिस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक संजय गोविलकर, अप्पर पोलिस अधीक्षक सुहास शिंदे, पोलीस उप अधीक्षक रत्नागिरी अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहा. पो. फौजदार उदय चांदणे, पोलीस हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, दिपक आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल राजेश गावकर, हेमंत पवार, वैशाली धनावडे यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT