रत्नागिरी : देशातील रेंटर हाऊससिंग मार्केटला पारदर्शक आणि संघटित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने घरभाडे नियम 2025 लागू केला आहे. त्यामुळे प्रत्येक भाडेकरार 2 महिन्यांत दोघांनाही नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास घरमालक, भाडेकरू या दोघांनाही तब्बल 5 हजार दंड होणार आहे.
नवीन नियमामुळे घरमालक-भाडेकरूंतील वाद कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या वतीने नवनवीन नियमावली करण्यास आली आहे. आता देशभरात नवीन भाडे करार 2025 लागू करण्यात आला आहे. घरासाठी 2 महिन्यांचेच भाडे डिपॉझिट घेता येईल.
भाडेवाढीआधी भाडेकरूला आधीच नोटीस द्यावी लागेल तसेच नोटीसविना भाडेकरूला घरातून काढता येणार नाही अशा अनेक तरतुदी नियमात करण्यात आल्या आहेत. नवीन नियमामुळे भाडेतत्वावर घर घेणे सोप होईल आणि मनमानी पध्दतीने घरभाडे वाढवणे, अधिक डिपॉझिट मागणे यासारख्या इतर समस्यांना सामना करावा लागणार नाही.
घरमाल आणि भाडेकरू यांना त्यांचा भाडेकरार ऑनलाईन नोंदणीकृत करावा लागेल. भाडेकराराची नोंदणी न केल्यास भाडेकरू आणि मालक या दोघांनाही 5 हजार रुपयांचा दंड बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.