रत्नागिरी : राज्यातील पशुपालन, शेळी मेंढीपालन, कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड मोहिम राबविण्यात येत आहे. या योजनेतर्गत ज्या शेतकन्यांकडे किसान कार्ड नाही, त्यांना १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध करून दिले जाणार आहे. दूध संस्थेचे हमी दिल्यास ही मर्यादा तीन लाख रूपर्यापर्यंत वाढवता येते. ज्यांत्र्याकडे आधीच किसान क्रेडिट कार्ड आहे, त्यांनाही तीन लाखांपर्यंतची पतमर्यादा वाढवून येता येणार आहे.
योजनेंतर्गत पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या देखभालीसाठी व दैनंदिन खर्चासाठी आकर्षक व्याज सवलतीसह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. कर्जाचा मूळ व्याजदर ९ टक्के असला तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ३ टक्के आणि राज्य शासनाच्या ११ फेब्रुवारी २०२६च्या निर्णयानुसार ४ टक्के अशी एकूण ७टक्क्यांपर्यंत व्याज सवलत मिळू शकते. बँकांनाही मात २ टक्के व्याज सवलत देण्यात आली आहे.
त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या पशुपालक, शेतक-यांना या योजनेंतर्गत शून्य टक्के व्याजदाराचाही लाभ घेता येवू शकतो. सन २०२६-२७ पासूनमु ख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्ग पात्र लाभार्थ्यांना या क्रेडिट कार्डद्वारे खेळेत भांडवलाचा लाभ घेता येईल. राज्यातील १० लाख पात्र पशुपालकांना या योजनेच्या कक्षेत आणण्याचे उद्दिष्ट पशुसंवर्धन विभागाने ठेवले आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात अवथा १९६२ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
योजनेत २५ हजार मांसल कुक्कुट पक्षी, ५० हजार किंया त्यापेक्षा कमी अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी, ४५ हजार किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या हंवरी युनिट, शंभर किवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा गोठा, पाचशे किंवा त्यापेक्षा कभी मेंदी, शेळी गोठा, दोनशे किंवा त्यापेक्षा कमी पशुपालकांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केलेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परतफेड बारणे आवश्यक राहणार आहे.
ही आहे पात्रता
प्रकल्प, धराकाने, केंद्र, राज्य शासन, जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा, पशुपालन प्रकल्पांमधील सर्व पशुपनाची एनडीएलएम पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. व्याज परताना सबलव पुढीलप्रमाणे कमाल पशुधन संख्या असलेल्या पशुपालकांनाच अनुशेय राहील.