One person was swept away from the Kondi bridge over the Vanand river in Dapoli
दापोली : पुढारी वृत्तसेवा
दापोली तालुक्याच्या वनंद गावातील कांगणेवाडी येथील राजेंद्र उर्फ राजू कोळंबे (वय ४५) हे वनंद नदीतून वाहून गेल्याची घटना आज (सोमवार) दि २६ रोजी सकाळी घडली आहे.
दि २६ रोजी दापोलीत मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे कोंडी नदी पुलावरून पाणी वाहून जात होते. कोळंबे हे कांगणेवाडीतून या पुलावरून गुजरवाडीतून रोज दापोलीत कामाला ये-जा करत होते. तर दि २६ रोजी दापोली शहरात रात्रपाळी करून सकाळी घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.
राजू कोळंबे यांच्या वाहून जाण्याच्या घटनेची माहिती मिळताच दापोली महसूल, दापोली पोलीस प्रशासन, गावकरी त्यांचा शोध घेत आहेत. तर दापोलीत पडणाऱ्या या मुसळधार पावसाने पहिला बळी घेतला आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन दापोली प्रशासनाने केले आहे.