

रत्नागिरी : मागील चार दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. दरम्यान, रविवारी रविवारी पावसाने सकाळपासून दुपारपर्यंत विश्रांती घेतली तर दुपारपासून दिवसभर पावसाची संततधार दिसून आली. पावसामुळे अद्याप ही रत्नागिरीकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हवामान खात्याने ‘ ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
लांजा, दापोली, खेड, मंडणगड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यात दिवसभर पावसाची संततधार दिसून आली. समुद्र खवळलेल्या असल्याने मच्छीमार नौका समुद्रकिनारा किनार्यावरच दिसून आल्या. पावसाच्या संततधारेमुळे नागरिक छत्री घेऊन घराबाहेर पडत होते. शहरातील सखल भागात पाणी साचले असून रस्ते चिखलमय झाले आहेत. दरम्यान, मान्सून कोकणासह महाराष्ट्रात दाखल झाला आहे. ‘आयएमडी’कडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी गोवा व्यापत कोकणातील देवगडपर्यंत मजल मारली आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर दुसर्या दिवशी मान्सून कोकणात दाखल झाला आहे. मान्सूनच्या वाटचारीनुसार तो उत्तर सीमा देवगड, बेळगावी, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई येथून जात आहे.
पुढील दिवसात मान्सून मुंबईसह महाराष्ट्राच्या आणि बेंगळुरूसह कर्नाटकाच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यत आहे. याच काळात ईशान्येकडील राज्यात ही मान्सून दाखल होणार आहे.