तहसीलदार सुधीर सोनवणे यांना निवेदन देताना मनसे पदाधिकारी  (Pudhari Photo)
रत्नागिरी

Khed MNS Protest | मीरा -भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाचे खेडमध्ये पडसाद; मनसैनिकांचे आंदोलन

खेड तहसीलदारांना दिले निवेदन

पुढारी वृत्तसेवा

 Ratnagiri Khed MNS Marathi Morcha

खेड: मीरा- भाईंदर येथील मनसे नेते अविनाश जाधव यांना मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यास परवानगी नाकारून आज (दि.८) पहाटे पोलिसांनी अचानक अटक केल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मनसे नेते प्रकाश महाजन, वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी उतरून आंदोलन केले. यावेळी सरकारच्या दडपशाहीचा निषेध करणारे निवेदन तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी प्रकाश महाजन म्हणाले, राज्यातील अमराठी भाषिकांची मते मिळवण्यासाठी मराठी लोकांवर दडपशाही सरकार करत आहे. या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात राहणारे अन्य सर्व भाषिक इथले होऊन राहत आहे. मात्र काही ठराविक बिहार, उत्तर प्रदेश, आझमगड आदी भागातील लोक येथे येऊन राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अमराठी लोकांना चिथावणी देत असल्याचे मीरा भाईंदर येथे निघालेल्या अमराठी लोकांच्या मोर्चावरून सिद्ध झाले आहे.

मात्र, अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मराठी माणूस पक्ष भेद बाहेर पडून एकवटतो हे आज अविनाश जाधव यांना अटक झाल्यानंतर झालेल्या मोर्चातून सिद्ध झाले आहे, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT