मंडणगड : अपघातग्रस्त कार व दुचाकी. pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri Mandangad Accident - दुचाकी मंडणगडमध्ये अपघातात तरुणाचा मृत्यू

दुसऱ्या स्विफ्ट कार अपघातात महिला गंभीर

पुढारी वृत्तसेवा

मंडणगड - खेड-पुरार राज्य मार्गावर एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला आहे. कल्पेश प्रकाश आदावडे (वय ३५, मूळ रा. चिखलगाव, ता. दापोली) असे मृत तरुणाचे नाव आहे.

खेड-पुरार राज्यमार्गावर पालघर ते कुंबळेदरम्यान रविवारी सकाळी ८.३० वाजता झालेल्या अपघातात कल्पेश प्रकाश आदावडे (३५) हा जागीच ठार झाला. यासंदर्भात विलास मोहिते यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. या फिर्यादीतील माहितीनुसार, या दुचाकी गाडीवरील चालक कल्पेश आदावडे याने आपली दुचाकी बेदरकारपणे चालवून अपघात केला व स्वतःच्या मृत्यूस व फिर्यादीच्या अपघातास कारणीभूत ठरला. या फिर्यादीनंतर मृत तरुणाविरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तसेच दुसऱ्या एका अपघातात आंबडवे-लोणंद महामार्गावर तालुक्यातील शिरगाव येथे १८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मारुती स्विफ्ट कारच्या मेटल बॅरिकेडला धडक बसल्याने झालेल्या अपघातात डॉ. सबिया असद मुल्ला (वय ३२) या गंभीर जखमी भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचाराकरिता त्यांना मुंबई येथे पाठवण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT