Koyna Dam Water To Mumbai pudhari
रत्नागिरी

Koyna Dam Water To Mumbai: कोयनेचं पाणी मुंबईला नेण्यास महायुतीतील शिवसेनेचाही विरोध; प्रसंगी रस्त्यावर उतरणार

Koyna Dam Water To Mumbai: आधी कोकणाला पाणी पुरू द्या, मगच दुसरा निर्णय घ्या, असे सांगतानाच वेळ पडल्यास संघर्षासाठी आणि रस्त्यावर उतरण्यासाठीही तयार

Anirudha Sankpal

Koyna Dam Water To Mumbai: कोयना धरणातून वीजनिर्मितीनंतर सोडण्यात येणारे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयाला राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेनेनंही विरोध केला आहे. पाणी मुंबईला नेण्याच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाम आणि आक्रमक भूमिका मांडली.

आधी कोकण मगच बाकीचं...

अस्मिता केंद्रे यांनी, आधी कोकणाला पाणी पुरू द्या, मगच दुसरा निर्णय घ्या, असे सांगतानाच वेळ पडल्यास संघर्षासाठी आणि रस्त्यावर उतरण्यासाठीही तयार असल्याचं स्पष्ट केलं. याबाबत बोलताना केंद्रे यांनी सांगितलं की, शासनाची भूमिका चुकीची आहे, असं मी म्हणणार नाही, परंतु पहिल्यांदा कोकणाला पाणी पुरू द्या. कोकणाची जनता, उद्योग, व्यवसाय त्या पाण्यावरती अवलंबून आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांतील जनमाणसांना पहिल्यांदा पाणी पिऊ द्या. इथला उद्योग त्या पाण्यावरती अवलंबून आहे.

हीच जनभावना

अस्मिता केंद्रे यांनी पहिल्यांदा माझे कोकण पाण्यासाठी समृद्ध झाले पाहिजे, आणि नंतर आपण जो निर्णय घेताय तो घेतला तरी चालू शकेल. परंतु सध्या तरी आम्ही याला विरोध करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोकणातील जनतेच्या हक्काचं पाणी आधी कोकणाला मिळालं पाहिजे, हीच जनभावना असल्याचं केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT