रत्नागिरी: जाकीरहुसेन पिरजादे
मुलींचा दर वाढवणे, त्यास प्रोत्साहन देणे यासह विविध चांगल्या हेतूसाठी राज्य सरकारच्यावतीने महत्वाकांक्षी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा परिषद महिला च बालकल्याण विभागातर्फे २०२४-२५, २०२५-२६ या दोन वर्षात जिल्ह्यातील ३ हजार ५७६ बालिकांनी लेक लाडकी योजनेचा लाभ घेतला आहे. कोट्यवधीचे अनुदान लाभाध्यर्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्यात लाडकी लेक योजनेमुळे मुलींना आधार मिळत आहे.
विशेष राज्य सरकारच्या वतीने लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या कुटूंबांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयापेक्षा कमी आहे आणि जे पिवळे किंवा केशरी रेशनकार्डधारक, १ एप्रिल २०२३ नंबर जन्मलेल्या बालिकांना महिला व बालकल्याण विभागामार्फत लेक लाडकी योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते. रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस लेक लाडकी योजनेचा लाभ घेणाऱ्या बालिकांची संख्या वाढत चालली आहे. २०२४-२५ मध्ये २९०३ तर २०२५-२६ मध्ये ६७३ असे दोन वर्षात ३ हजार ५७६ पर्यंत मुली या योजनेचा लाभ घेत आहेत.
या योजनेमुळे मुलींना चांगले शिक्षण ही मिळत आहे. गरीब परिस्थितीमुळे शाळेपासून वंचित राहण्याचे प्रमाण ही कमी झाले आहे. मुलीच्या जन्माचा आदर वाढला असून स्त्रीभृण हत्या कमी होण्यास मदत होत आहे. शासनाच्यावतीने अनुदान मिळत असल्यामुळे कुटूंबाला ही आधार मिळत आहे. दरम्यान, ज्या कुटूंबांनी या योजनेचा लाभ घेतला नाही, त्यांनी जवळच्या अंगणवाडी शाळेत नाव नोंदवावे, या योजनेचा लाभ घ्यावा असेही आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
योजनेच्च्चा हा आहे उद्देश
जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलीची संख्या शून्यापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करणे, कुपोषण कमी करणे, मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलीच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे हा
असे दिले जातात हप्ते
पहिला हप्ता मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रूपये
दुसरा हप्ता पहिलीत ६ हजार रूपये
तिसरा हप्ता सहावीमध्ये ७ हजार रूपये
चौथा हप्ता अकरावीत ८ हजार ३३ रूपये
मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रूपये प्रमाणे ९ लाख एक हजार रक्कम देण्यात येणार