Medical Education 
रत्नागिरी

Lanja Health Department | लांजा तालुक्यात आरोग्य यंत्रणेचे वाभाडे! 125 पैकी 61 पदे रिक्त, रुग्णांचे प्रचंड हाल

Lanja Health Department | लांजा तालुक्याच्या आरोग्य विभागावर पडतोय ताणतालुक्यात ग्रामीण रुग्णालय १ व ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर २९ उपकेंद्रे कार्यरत; १२५ मंजूरपैकी ६४ भरली तर ६१ पदे रिक्त

पुढारी वृत्तसेवा

लांजा : प्रवीण कांबळे

लांजा तालुक्याचा आरोग्य विभाग कामाच्या अतिरिक्त ओझ्याखाली सेवा बजावत असल्याचे चित्र सध्या तालुका आरोग्य विभागात पाहायला मिळत आहे. लांजा तालुक्याच्या आरोग्य विभागात एकूण ६१ पदे रिक्त असल्याचा प्रकार समोर आला असून, या रिक्त पदांमुळे आरोग्य विभागावर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे लांजा तालुक्याच्या आरोग्य विभागात अत्याधुनिक सुविधांची वानवा आणि अल्प कर्मचारी संख्याबळामुळे आरोग्य कोलमडले आहे.

सध्या पावसाळा सुरू असून या हंगामात आरोग्य यंत्रणांची धावपळ होत असते. लांजा तालुक्यात एकूण ६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्या अंतर्गत २९ उपकेंद्र आहेत. मात्र सध्या कार्यरत असणाऱ्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी तालुक्याच्या आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. यासह महत्त्वपूर्ण आरोग्य सुविधांची कमतरता असल्याने रुग्णांना जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयांच्या सेवेचा आधार घ्यावा लागत आहे. लांजा तालुक्याच्या आरोग्य अंतर्गत एकूण सहा आरोग्य केंद्र असून यामध्ये भांबेड, जावडे, वाडीलिंबू, साटवली, शिपोशी, रिंगणे कार्यरत आहेत.

तर २९ उपकेंद्र आहेत. भांबेड प्रा. आरोग्य केंद्रात २२ पैकी १३ पदे कार्यरत तर ९ पदे रिक्त आहेत. साटवलीमध्ये २१ मंजूर पैकी ९ कार्यरत १२ रिक्त आहेत. जावडे प्रा. आरोग्य केंद्रामध्ये १९ मंजूरपैकी १० कार्यरत तर ९ रिक्त आहेत.

साटवलीमध्ये २१ मंजूर पैकी ९ कार्यरत १२ रिक्त आहेत. जावडे प्रा. आरोग्य केंद्रामध्ये १९ मंजूरपैकी १० कार्यरत तर ९ रिक्त आहेत. प्रा. आ. केंद्र १७ मंजूरपैकी ८ कार्यरत असून ९ रिक्त आहेत. रिंगणे २० मंजूरपैकी १० कार्यरत तर १० रिक्त आहेत. प्रा. आ. केंद्र शिपोशीमध्ये २१ मंजुरीपैकी ११ कार्यरत तर १० रिक्त आहेत. यासह तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात मंजूर ५ पैकी ३ कार्यरत असून २ रिक्त आहेत. अशी एकूण अपेक्षित मंजुरी असणाऱ्या १२५ पदांपैकी फक्त ६४ पदे सध्या कार्यरत असून तब्बल ६१ पदे रिक्त आहेत.


तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामध्ये १ रिक्त आहे. आरोग्य सहायक (स्त्री) रिंगणे येथे १ रिक्त. आरोग्य सेवक पुरुष भांबेड येथे १ रिक्त, साटवली १ रिक्त, जावडे २, वाडीलिंबू २ अशी एकूण ६ पदे रिक्त आहेत. यामध्ये आरोग्य सेविका (नियमित): भांबेड येथे ३ पदे रिक्त, साटवली ५ रिक्त, जावडेत २ रिक्त, वाडीलिंबू २ रिक्त, रिंगणे ३, शिपोशी ४ अशी एकूण १९ पदे रिक्त आहेत. वाहन चालक (नियमित): भांबेड येथे १ रिक्त, साटवली १ रिक्त, जावडे १, वाडीलिंबू १, रिंगणे १, शिपोशी १, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात १ अशी एकूण ६ पदे रिक्त आहेत.

परिचर विभागात: भांबेड येथे २ रिक्त, साटवली ३, जावडे ३, वाडीलिंबू ३, रिंगणे ३, शिपोशी ३, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय १ अशी एकूण १८ पदे रिक्त आहेत. स्त्री परिचर: यामध्ये भांबेड १, साटवली १, जावडे १, रिंगणे १, शिपोशी १ अशी एकूण ५ पदे रिक्त. सफाई कामगार: यामध्ये भांबेड येथे १, साटवली १, वाडीलिंबू १, रिंगणे १, शिपोशी १ अशी एकूण ५ पदे रिक्त असून लांजा तालुका आरोग्य विभागात एकूण ६१ पदे सदर रिक्त आहेत. यामध्ये २८ उपकेंद्रांपैकी शिपोशी येथे १, पालू येथे १, वाकेड १, व्हळ येथे १ अशी चार पदे आरोग्य सेवक पुरुष संवर्गातील पदे रिक्त आहेत.


या रिक्त पदांच्या अभावामुळे तालुक्याच्या आरोग्य विभागावर अतिरिक्त कामाचा परिणाम होत आहे. कर्मचारी तुटवड्यामुळे तालुक्यातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी वाट पहावी लागत असते. त्यामुळे रुग्ण व आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद होण्याचे प्रकार घडत आहेत. शहर भागापेक्षा तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडतो असल्याने कर्मचारी दबावाखाली काम करत आहेत.

प्रशासनाने रिक्त पदे भरण्याची होतेय मागणी

तालुक्याच्या आरोग्य विभागात निम्मी महत्त्वाची पदेच रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडते आहे. तालुक्यात सुरळीत रुग्ण सेवा देण्यासाठी आरोग्य प्रशासनाने रिक्त पदे भरावीत, अशी मागणी तालुक्यातील सुजाण नागरिकांमधून केली जात आहे.

तालुक्याच्या आरोग्य विभागामध्ये एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, अपघात विभाग, बालरोगतज्ज्ञ, सर्पदंशावर उपचार सेवा, आयसीयू ॲम्बुलन्स आरोग्य विभागातील अशा विविध पद्धतीच्या सेवा मिळत नसल्याने रुग्णांना रत्नागिरी किंवा अन्य उपचारासाठी धावपळ करावी लागत आहे. मात्र, आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रमाणच कमी असल्याने लांजा तालुक्याचा आरोग्य विभाग अतिरिक्त ओझ्याखाली सेवा बजावत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT