Mahad | रेल्वे प्रवाशाच्या 3 लाख 60 हजारांच्या दागिन्यांची चोरी

महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mahad | Railway passenger's jewelry worth 3 lakh 60 thousand stolen
रेल्वे प्रवाशाच्या 3 लाख 60 हजारांच्या दागिन्यांची चोरीPudhari News Network
Published on
Updated on

महाड : रेल्वे प्रवासादरम्यान वीर रेल्वे स्टेशनजवळ 3 लाख 60 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरीची घटना 15 सप्टेंबर रोजी घडली आहे. महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीत 15 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दिवा सावंतवाडी ट्रेनने प्रवास करीत असताना महाड तालुक्यातील विर रेल्वे स्टेशन जवळ दुपारी चार ते सायंकाळी पाच वाजण्याचे दरम्यान मुंबई-बोरीवली येथील महिला फिर्यादी (मुळ राहाणार तालुका खेड, जिल्हा रत्नागीरी) या दिवा सावंतवाडी ते बोरीवली असा रेल्वेने प्रवास करीत असताना विर रेल्वेस्टेशनच्या जवळ 5 मिनीटे अगोदर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या जवळील मोठ्या पर्समध्ये ठेवलेला मोबाईल बाहेर काढला.

त्यावेळी फिर्यादीच्या खांद्याला लावलेल्या गुलाबी रंगाची व राखाडी रंगाचे पट्टे असलेली मोठ्या पर्समध्येठेवलेली काळ्या रंगाची एकूण 3 लाख 60 हजार रुपये किंमतीचे दागीने ठेवलेली लहान पर्स कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवुन चोरुन नेली. याबाबत महाड तालुका पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई खुशल खेडेकर हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news