रेल्वेचे यार्ड रिमॉडेलिंगमुळे गाड्यांचे वेळापत्रक येणार रुळावर pudhari photo
रत्नागिरी

Konkan Railway Delay | कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! रविवारी चाकरमान्यांना तब्बल 11 तास विलंबाचा प्रचंड मनस्ताप

Konkan Railway Delay | अनेक गाड्या तब्बल ११ तास विलंबाने; मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांची परवड

पुढारी वृत्तसेवा

मळगांव : पुढारी वृतसेवा

कोकण रेल्वेमार्गावर उन्हाळी सुट्टीचा आनंद घेऊन कोकणातून मुंबईकडे रवाना होणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांना रविवारी ११ तास विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. मुंबईतून कोकणात येणाऱ्या व कोकणातून मुंबईत जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्यामुळे रविवारी दुपारपासून मध्यरात्री १.३० वा. पर्यंत प्रवाशांना रेल्वेच्या प्रतीक्षेत ताटकळत बसावे लागले.

कोकण रेल्वेचे योग्य नियोजना अभावी प्रवाशांना गैरसोयीस सामोरे जावे लागले असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत होता कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी हंगामासाठी रेल्वे शासनाने विशेष गाड्या सोडून रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु नियमित धावणाऱ्या गाड्या तसेच उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक रविवारी कोलमडले होते.

मे च्या १ तारीख पासून उन्हाळी सुट्टी हंगाम सुरू झाला, तिथपासून रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकांचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत आहे. सुरुवातीला एकेरी मार्गाच्या देखभाल दुरुस्तीची कामे प्रशासनाने हाती घेतली होती. त्यामुळे रेल्वेगाड्या १५ ते १६ तास विलंबाने धावत होत्या. तर आता कोकण रेल्वेने मान्सूनपूर्व कामांना वेग दिला आहे. परिणामी गाड्यांचा वेग मंदावल्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे.

रविवार असल्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने जादा गाड्या चालवल्या, मात्र गाड्यांचे योग्य नियोजन न झाल्यामुळे वेळापत्रक पूर्णता कोलमडून गाड्या सुमारे ११ तास उशिराने धावत होत्या. रविवारी गाडी क्र. ११०९९ एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस एक तास उशिराने आली होती.

तीच गाडी क्र.१११०० मडगाव एलटीटी एक्स्प्रेस तब्बल ११ तास विलंबाने धावली. गाडी क्र. २०११२ कोकणकन्या एक्स्प्रेस ३ तास विलंबाने तर गाडी क्र. ०१०२० सीएसएमटी सुपर एक्स्प्रेस ७ तास विलंबाने धावली. कोकण रेल्वे मार्गावर दररोज सरासरी ७६ रेल्वेगाड्या धावतात. हंगामात प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासन जादा गाड्या चालवते.

मात्र कोकण रेल्वेचा मार्ग एकेरी असल्याने वेळापत्रक विस्कळीत होत असल्याचे कोकण रेल्वेचे प्रशासनाकडून सांगण्यात आले कोकण रेल्वेच्या मार्गातील प्रत्येक रेल्वे स्थानकांवर गाड्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासह मुलभूत सुविधा न मिळालाने रेल्वे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रविवार निघून दुसऱ्या दिवशी कामा, धंद्यांवर वेळेत हजर होण्याचे नियोजन केलेल्या हजारो प्रवाशांना या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा त्रास सहन करावा लागला. त्यांना आर्थिक नुकसानीला व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस

सावंतवाडीतूनच सोडण्याची मागणी उन्हाळी सुट्टीच्या हंगामात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्या पासून गाडी क्र. ११०९९/१११०० एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस ३१ मे पर्यंत नेहमीच विलंबाने धावत होती. कोकणातून मोठ्या प्रमाणात प्रवाशी या गाडीतून प्रवास करतात. त्यामुळे ही गाड़ी कोकण रेल्वे प्रशासनाने मडगावऐवजी सावंतवाडीपर्यंतच चालवावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT