Konkan Board Tops in Maharashtra Pudhari photo
रत्नागिरी

Konkan Board Tops in Maharashtra - राज्यामध्ये कोकण बोर्डच सरस

सात विद्यार्थ्यांना मिळाले १०० टक्के गुण

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक्क व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेच्या निकालात अपेक्षेप्रमाणे कोकण विभागाने यावेळीही राज्यात अव्वल स्थान कायम राखले आहे. मागील १५ वर्षापासून सलग प्रथम क्रमांक पटकावण्याची उल्लेखनीय परंपरा कोकण विभागाने चंदाही कायम ठेवली. यावेळी कोकण विभागाचा एकूण निकाल २७.६२ टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत निकालात १.२ टक्क्यांची घट झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल १७.३७ टक्के लागला आहे. कोकण बोर्डात ७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाल्याची माहिती विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कोकण बोर्डाच्या रानागिरी कार्यालवात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल २७.३७ टक्के, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल २१.३२ टक्के लागला, रत्नागिरी जिल्ह्यातील १७ हजार २१ विद्याव्यांपैकी १६ हजार ५७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात मुलींची कामगिरी विशेष ठरली असून, मुलांचा निकाल २६.५० टक्के, तर मुलींचा निकाल ९८.२८ टक्के लागला. रत्नागिरी जिल्ह्यातील २३० शाळांचा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. याशिवाय रत्नागिरीतील चार तर सिंधुदुर्गमधील तीन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील ७३ केंद्रांवर आणि सिंधुदुर्ग जिल्द्वातील ४१ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेस अनुक्रमे रानागिरी ४१२ य सिंधुदुर्गात २२८ शाळांतील विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ३९ टक्के तर खासत्री विद्यार्थ्यांचा निकाल ७९.५७टक्के लागल्याची माहितीही मंडळातर्फे देण्यात आली.

निकालानंतर विद्याथ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती तसेच पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ९ मे ते २३ में या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाच्या दहावी परीक्षेतही कोकण विभागीय मंडळ निकालात प्रथम क्रमांकावर आहे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यार्थी, पालक यांचे है श्रेय आहे. निकालात मागील वर्षीच्या तुलनेत राज्याच्या निकालात २.०१% तर कोकणात १.२% घट झाली असली तरी राज्यात कोकणचा क्रमांक प्रथम कायम आहे.

शिवाय सिंधुदुर्ग जिल्द्वयाने राज्यातील प्रथम क्रमांक कायम राखला आहे. यावर्षीच्या परीक्षेत प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्हीचा केलेला वापर यामुळे निकालातील पारदर्शकता वाढली आहे. तसेच निकालात घट झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रलागिरी जिल्ह्यात १००% केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक वर्गखोलीत लावण्यात आले होते. गैरप्रकारमुक्त परीक्षा घेण्यासाठी सहकार्य केलेल्या जिल्हा दक्षता समिती तसेच विभागातील सर्व क्षेत्रीय घटकांचे आभार व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे राजेश क्षीरसागर यांनी विशेष अभिनंदन केले.

फाटक हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींना शंभर टक्के

फाटक हायस्कूलच्या दौन विद्यार्थिनींना दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळाले. नवेली भिंगार्डे व पर्णिका परांजपे या दोघींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

तालुकानिहाय निकाल

रुनागिरी २७.९२ टक्के, खेड २७.८०, चिपळूण १७.४८, राजापूर ११७.३२, दापोली १७.२६, संगमेश्वर २७.२५, लांजा २७.११, गुहागर २६,४० तर मंडणगड ९४.८९ टक्के.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT