Arrested Pudhari
रत्नागिरी

Jambhari bomb blast arrest-जांभारीतील गावठी बॉम्ब स्फोट प्रकरणी संशयिताला अटक; देवरुख येथून घेतले ताब्यात

जांभारीतील गावठी बॉम्ब स्फोट प्रकरणी संशयिताला अटक; देवरुख येथून घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : तालुक्यातील जांभारी येथील गावठी बॉम्बचा स्फोट होवून महिलेला झालेल्या गंभीर दुखापत प्रकरणी जयगड पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे १९ मे २०२५ रोजी घडलेल्या या घटनेचा दिड महिन्यानंतर उलगडा करण्यात जयगड पोलिसांना अखेर यश आले अविनाश गोपिनाथ खेडेकर (३६, रा. देवरुख) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे गुरुवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे

जयगड पोलिसांनी अविनाश याला देवरुख येथून अटक केली आहे अविनाश याच्यासोबत आणखी आरोपी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे तसेच अविनाश याने गावठी बॉम्ब बनविण्यासाठी लागणारे साहित्य कोठून आणले, गावठी बॉम्ब कसे व कुठे तयार केले जयगड परिसरात तो कसा आला? याबाबत तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे तसेच यापूर्वी देखील जयगड परिसरात गावठी बॉम्बचा स्फोट होवून एका बैलाला गंभीर दुखापत झाली होती याप्रकरणाचा संबंध अविनाश याच्याशी आहे का याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे.

जांभारी येथे घडलेल्या गुह्यातील माहितीनुसार रेश्मा प्रमोद सुर्वे (४५, रा जांभारी रत्नागिरी) या १९ मे २०२५ रोजी घराच्या कुंपणासाठी लागणारे कलक आणण्यासाठी पतीसोबत जांभारी येथील जंगलात गेल्या होत्या कलकाच्या बेटामध्ये काही कलक तोडून झाल्यानंतर पती प्रमोद हे घरी पाणी पिण्यासाठी गेले होते तर रेश्मा या त्याचठिकाणी कलक तोडत होत्या. तसेच तोडलेले कलक गोळा करत होत्या रेश्मा यांना गोलाकार वस्तू दिसून आली ही वस्तू रेश्मा यांनी हातात उचलताच अचानक मोठा स्फोट झाला.

या बॉम्बच्या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, रेश्मा यांच्या हाताची बोटे तुटून गंभीर दुखापत झाली होती स्फोटानंतर जयगड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता त्याठिकाणी २० ते २५ जीवंत गावठी बॉम्ब असल्याचे आढळून आले हे बॉम्ब जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी पेरुन ठेवण्यात आले होते. याप्रकरणी जयगड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता अखेर दिड महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला असून आरोपिला पोलिसांकडून अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT