Rajapur Panchayat reservation-आता लक्ष पंचायत समिती गणांच्या आरक्षणाकडे

राजापूर पं. स. सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी आरक्षित
Rajapur Panchayat reservation
Rajapur Panchayat reservation
Published on
Updated on

राजापूर : राजापूर पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाल्यानंतर आता समस्त - राजापुरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष १२ पंचायत समिती गणांच्या - आरक्षणाकडे लागून राहिले आहे. दरम्यान, राजापूरचे सभापतिपद ना.मा.प्र. महिला आरक्षित झाल्याने - पंचायत समितीचे कोणते गण त्या प्रवार्गासाठी आरक्षित होतात, याकडे - राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. राजापूर पंचायत समितीच्या आजवरच्या इतिहासात आठ महिलांना सभापती पदाची संधी मिळाली आहे.

राजापूर पंचायत समितीचे सभापतिपद आणि नंतर रत्नागिरी जि.प. अध्यक्षपद भूषवणाऱ्या प्रतिभा गुरव या राजापूर तालुक्यातील एकमेव महिला आहेत. राजापूर पंचायत समितीत बारा गण असून त्यामध्ये वडदहसोळ, रायपाटण, तळवडे, ताम्हाणे, केळवली, जुवाठी, धोपेश्वर, पेंडखळे, नाटे, साखरीनाटे, अणसुरे, कातळी यांचा समावेश आहे.

Rajapur Panchayat reservation
Ratnagiri political news | ग्रामपंचायतीत बिनविरोधच्या नावाखाली ग्रामीण भागात दबावतंत्र : प्रसाद सावंत

मागील प्रमाणेच पंचायत समितीच्या गणांची संख्या (१२) राहिली असली, तरी त्यांच्या नावात मात्र बदल झाले आहेत. केवळ चारच गण पहिल्या नावाने राहिले असून उर्वरित आठ गण नवीन नावाने ओळखले जाणार आहेत. आता या बारा गणांत कोणते आरक्षण राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र पडते त्याची उत्सुकता तालुक्याला लागून राहिली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर झालेल्या सभापती पदाच्या आरक्षणात राजापूरचे सभापतिपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे राजापूर पंचायत समितीचे कोणते गण या प्रभागासाठी आरक्षित होतात, त्याची मोठी उत्सुकता समस्त तालुक्याला लागून राहिली आहे.

मागील काही वर्षांवर एक कटाक्ष टाकला असता, राजापूर तालुक्यातील एकूण आठ महिलांना राजापूर पंचायत समितीचे सभापतिपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. त्यामध्ये प्रतिभा गुरव (१४ मार्च १९९७ ते १३ मार्च १९९८) यांना तालुक्याच्या पहिल्या महिला सभापती होण्याचा बहुमान मिळाला होता, तर त्यानंतर सुजाता ठुकरूल (१४ मार्च २००७ ते ०७ जुलै २००८), चेतना राजेश पारकर (२१ जुलै २००८ ते २६ नोव्हेंबर २००९) पल्लवी प्रकाश तळेकर (२७ नोव्हेंबर २००९ ते १३ मार्च २०१२) सोनम संतोष बावकर (१४ सप्टेंबर २०१४ ते १३ मार्च २०१७) विशाखा विश्वनाथ लाड (३० डिसेंबर २०१९ ते १९ ऑक्टोबर २०२२) प्रमिला प्रभाकर कानडे (०३ नोव्हेंबर २०२१ ते ३० जून २०२१) करुणा कमलाकर कदम (०९ ऑगस्ट २०२१ ते १३ मार्च २०२२) असा आठ महिलांना सभापती पद भूषविता आले होते.

Rajapur Panchayat reservation
Ratnagiri Devrai land | कोकणातील देवराई भूमी 'शासन जमा'ची होणार चौकशी

त्यानंतर आता राजापूरची नववी महिला सभापती कोण होणार, याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. राजापूर पंचायत समितीचे सभापती पद आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या यादीमध्ये प्रतिभा गुरव या एकमेव महिला आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news