Raigad Rain Update
खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.  file photo
रत्नागिरी

Ratnagiri Rain Updates | खेडमध्ये मुसळधार; जगबुडी नदी धोका पातळीवर

पुढारी वृत्तसेवा

खेड : तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. शहरातील मटण मार्केट जवळून शहरात पुराचे पाणी शिरले असून नदी किनाऱ्यावरील व्यापारी व नागरिक धास्तावले आहेत. शहराजवळ पावसाची संततधार नसली तरी जगबुडी नदीचा उगम असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराजवळ नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली असून खेड-दापोली मार्गावर पाणी आल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास खेडमध्ये महापुराची भीती वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने देखील सतर्क राहण्याचे आवाहन नदी किनाऱ्यावरील नागरिकांना केले आहे. खेडमध्ये काही शाळांना पूरस्थितीमुळे सुट्टी देण्यात आली आहे. सातारा व रत्नागिरीच्या सीमा भागात सह्याद्रीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे खेड मधील जगबुडी नदी किनाऱ्यावर पूरस्थिती निर्माण होत असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन आपत्ती नियंत्रण कक्षातून करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT