नाताळ, नववर्ष स्वागतासाठी गणपतीपुळे सज्ज! 
रत्नागिरी

Ganpatipule tourism : नाताळ, नववर्ष स्वागतासाठी गणपतीपुळे सज्ज!

जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळाकडे वळू लागली देश-विदेशातील पर्यटकांची पावले

पुढारी वृत्तसेवा

वैभव पवार

गणपतीपुळे ः जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गणपतीपुळे नाताळ सण आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता देश-विदेशातील पर्यटकांची पावले या जागतिक पर्यटन स्थळाकडे वळू लागली असून, नाताळ पर्यटन हंगामात पर्यटकांचा मोठा जनसागर उसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या पर्यटन हंगामात सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या पार्श्वभूमीवर येथील खासगी हॉटेल्स आणि लॉजिंगमध्ये तसेच खास कोकणी पद्धतीच्या घरगुती निवासस्थानांमध्ये पर्यटकांनी आपल्या निवास बुकिंगला सुरुवात केली असून, महाराष्ट्र पर्यटन निवास महामंडळाचे पर्यटन निवास असलेल्या एमटीडीसी रिसॉर्टमध्येदेखील पर्यटकांनी निवासासाठी विशेष पसंती दर्शवली असून, आरक्षण ‌‘फुल्ल‌’ झाले असल्याचे गणपतीपुळे येथील निवास महामंडळाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

सरस उत्पादन-विक्री प्रदर्शन

दरवर्षी गणपतीपुळे येथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी, तसेच नाताळ सणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. या हंगामात सर्वच पर्यटकांकडून गणपतीपुळे येथील श्रींच्या दर्शनाबरोबरच पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला जातो. तसेच नजीकच्या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने फिरकत असतात. याच पर्यटन हंगामात गणपतीपुळे येथे जिल्हास्तरीय सरस उत्पादन आणि विक्री प्रदर्शन होत असल्याने पर्यटकांना कोकणातील खास कोकणी उत्पादनाचा आणि विविध रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मिळतो. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने गणपतीपुळेला आपली पसंती दर्शवतात.

अनेक पर्यटक दाखल

तसेच डिसेंबर या सरत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील अखेरच्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक दाखल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच 2026 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची संख्या अधिक वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकूणच नाताळ पर्यटन हंगामात सुगीचे दिवस आले असून येथील सर्वच लहान-मोठ्या व्यवसायाला आर्थिक चालना मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT